नोकरी

बापूसाहेब सांडभोर यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांची अचानक बदली

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

रविवार.दि.4. ऑग

संभाजी पुरीगोसावी सातारा जिल्हा प्रतिनिधी

सातारा जिल्हा पोलीस दलातील महाबळेश्वर पोलीस ठाण्याला आता कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी लाभला आहे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्याकडे महाबळेश्वर पोलीस ठाण्याची जबाबदार देण्यात आली आहे, महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे, सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे आणि पर्यटन प्रेक्षणीय ठिकाण म्हणून पाचगणी महाबळेश्वर दोन्ही शहरांची ओळख आहे, तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या बदलीनंतर पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी मार्च महिन्यांत पोलीस ठाण्याचा पदभार घेतला होता, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे निर्माण झाल्यामुळे त्यांची अवघ्या पाच महिन्यांत बदली करण्यात आली आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात हजर राहून आपला पदभार स्वीकारला आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!