
संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
शुक्रवार.दि.27.9.2024 सप्टेंबर

पूर्णा/मध्यरात्री वाळूची तस्करी करणारा टिप्पर पोलीसानी पकडून टिप्पर चालक व मालकावर पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिस सुत्रा कडून मिळालेली अधिक माहिती अशी पूर्णा शहरात रात्रीच्या वेळी पोलीसाची गस्त सुरू होती मध्ये रात्री शहरातील हिंदु समशान भूमीच्या पाठी मागे वाळू तस्करी करणारा टिप्पर क्र एम एच 14 बी जे 0594 चा चालकाने पोलिसांची गाडी पाहून टिप्पर सोडून पडून गेला तेव्हा पोलिसांनी सदर टिप्परचा पंचनामा करून टिप्पर पोलिस ठाण्यात आणले आणि पोलीस शिपाई संदीप चौरे याच्या फिर्यादी वरून आरोपी चालक व मालक गजानन गोविद कोमटवार याच्या वर पूर्णा पोलीस ठाण्यात गुरन 329/24 कलम 303 (2) Bns सह कलम (7)(8)गौण खनिज कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पो उप नि केंद्र करत आहे.नदी पात्रातून दिवस रात्र खुलेआम वाळू तस्करी करण्यात येत आहे या कडे मात्र महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे त्यामुळे या कडे लक्ष देण्याची मागणी होत आहे



