नोकरीपरभणी

बलेनो गाडीतून तस्करीसाठी आलेला गुटखा पोलीसांनी पकडला, अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांची कारवाई

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

गुरुवार.दि.26.9.2024. सप्टेंबर


पूर्णा/प्रतिनिधी •
येथील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या पथकाने शहरात बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री छापेमारी करत एका बलेनो कारमधून तस्करी होत असलेला ११ हजार ८०० रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा ४ लाख रुपये किंमतीची कार असा ४ लाख १८ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जप्त करत पूर्णा पोलीसांत दोन अज्ञात ईसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी मध्यरात्री पो. निरीक्षक विलास गोबाडे यांना पूर्णेत एक बलेनो कार गुटखा तस्करीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यामाहिती आधारे त्यांनी आपल्या सह फौजदार केंद्रे पो.कॉ. नळगीरकर पो.कॉ. शेंबेवाड यांना सोबत घेऊन शहरात सापळा लावला. मध्यरात्री दिड ते दोनच्या सुमारास गवळी गल्ली परिसरात त्यांना एका बलेनो गाडीतून गुटखा तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. पो.नी गोबाडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी छापा घातला. यावेळी अंधाराचा फायदा घेत गुटख्याचे पोते गाडीतून उतरवणा-या दोघांनी पोलिसांना पाहून पोबारा केला. पोलिस पथकाने घटना स्थळावरून (एम.एच.१७/ बी. व्ही/४३७३) ग्रे रंगाची बलेनो कार व त्यात पोत्यामध्ये ११ हजार ८०० रुपये किंमतीचा विमल गुटखा, ४ लाख रुपये किंमतीचे जुने चारचाकी वाहन तसेच असा ४ लाख ११ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पूर्णा पोलीस ठाण्यात पो.कॉ. मनोज नळगीरकर यांच्या फिर्यादी वरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार चंद्रकांत केंद्रे हे करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!