परभणी

प्रा.प्रदिप कदम यानां नॅशनल इन्स्पियरींग आयकॉन अवॉर्ड पुरस्कार प्रदान

शनिवार.28 डिसेंबर 2024

पुर्णा [प्रतिनिधी] दोडासन बाला लोअर क्लब लडाख(जम्मु अॅन्ड काश्मीर]च्या वतीने देण्यात येणारा वर्ष 2024 चा “नॅशनल इन्स्पियरींग आयकॉन अवॉर्ड “सामाजिक व शैक्षणिक क्षेञातील उल्लेखनीय कार्या बद्दल येथील प्रा.प्रदिप सिताराम कदम यानां नुकताच प्रदान करण्यात आला .
मराठवाडय़ातील ग्रामीण भागात अनेक विविध सेवाभावी कार्यातून शिक्षण व सामाजिक क्षेञात त्यांनी व्याख्याने , आरोग्य शिबीर , शैक्षणिक साहित्य वाटप , स्पर्धात्मक मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमाचा माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचीं या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे या पुरस्काराचे स्वरुप सन्मान पञ, सन्मानचिन्ह स्नेंहवस्ञ , व ग्रंथ असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे
या पुरस्काराचे वितरण दि.22डिसेंबर रवीवार रोजी नादेंड येथील दादाराव वैद्य सभागृहात वजिराबाद नांदेड येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात नादेंड चे प्रसिध्द वैद्यकीय क्षेत्रातील डाॅ.हंसराज वैद्य व सत्यप्रभा चे संपादक संतोष पंडागळे याचां शुभहस्ते देण्यात आला आहे .
याच्यां या यशाबद्दल पुर्णेचे माजी नगराध्यक्ष व जेष्ठ नेते श्री.उत्तमराव कदम जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.मोहनराव मोरे, सचिव सौ.रजनीताई भगत[मोरे]प्राचार्य नानासाहेब भालेराव, पञकार जगदीश जोगदंड पाटील,विजय बगाटे ,अतुल शहाणे, प्रा. पंडीत रणवीर ,गंगाधर सोनटक्के प्रा उत्तम मोरै ,प्रा.सतिश भालेराव,बबन बगाटे,प्रकाश महाजन,सुनिल पारवे ,दत्तात्रेय गंगोञे बबन पारवे ,सत्यम खंडागळे ,संदिप विश्वासराव, देवानंद भारती , मारोती मुडें आदिनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!