पूर्णा तालुक्यात खुलेआम वाळू तस्करीने गाठला कळस

बुधवार .12.फेब्रुवारी 2025
पुर्णा प्रतिनिधी /पुर्णा तालुक्यात सद्या महसूल व पोलिसाच्या आशिर्वादानी खुलेआम वाळू तस्करी त्याच बरोबर मटका,जुगार अड्डे,अवैध वाहतूक, अवैध दारूची विक्री,गाजा तस्करी असं सर्व अवैध धंदे सुरु आहे त्यामुळे पूर्णा पोलीस ठाण्याचा निरीक्षण करण्यास येणारे विशेष पोलीस निरीक्षक सह सर्व वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का?आशा प्रश्न सर्व सामन्यान मध्ये उपस्थित होत आहेपूर्णा तालुक्यातील वाहनांऱ्या नदी मधून खुलेआम वाळू तस्करीं करण्यात येत आहे यास तर महसूल खात्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार, तलाठी ,मंडळ अधिकारी यांनी हातमिळवणी करून दुर्लक्ष केले आहे तर दुसरी कडे सर्वत्र बिनधास्त पण जागोजागी मटका,जुगार अड्डे,देशी दारूची विक्री,अवैध वाहतूक जोमाने सुरु आहे या सर्व सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे तालुक्यातील शांतता सुव्यवस्था बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होऊन गुन्हेगारीत वाढ झाली त्यामुळे या कडे पो उप विभागिय अधिकारी ही दुर्लक्ष करत आहे सर्व अवैध धंदे स्थानिक पोलिसांच्या मूक सहमती सुरू असल्याचे बोल जात आहे त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटी पूर्णा पोलीस ठाण्याचे वार्षिक तपासणी साठी नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक तथा वरिष्ठ अधिकारी येणारे आहे त्यामुळे ते सुरु असलेल्या अवैध धंदेया कडे लक्ष द्यावे अशी मागणी पुढे येत आहे



