गंगाखेडच्या समस्या आणि गणेशपुरी मठ विकासासाठी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे आक्रमक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

शुक्रवार 3 जूलै 2026
प्रतिनिधी किशोर सूर्यवंशी
गंगाखेड:गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वाढत्या लोडशेडींगच्या समस्येवर आणि गणेशपुरी मठ संस्थानच्या विकास आराखड्याबाबत गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे यांनी मुंबई येथील विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. या महत्त्वपूर्ण भेटीवेळी पाथरी विधानसभेचे आमदार राजेश दादा विटेकर देखील उपस्थित होते.लोडशेडींगमुळे नागरिक त्रस्तमतदारसंघातील वीज समस्येवर प्रकाश टाकत, आ. डॉ. गुट्टे यांनी निवेदनात नमूद केले की, सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ग्रामीण भागात होणाऱ्या नियमित लोडशेडींगमुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता मोठ्या अडचणीत सापडली असून, आता ही समस्या नागरिकांच्या सहनशक्तीपलीकडे गेली आहे.गणेशपुरी मठ संस्थानचा विकास आराखडायासोबतच, सुमारे ७०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशपुरी मठ संस्थानाच्या विकासाचा प्रश्नही त्यांनी लावून धरला आहे. या संस्थानाकडे २०० एकरपेक्षा अधिक मालकीची जमीन असल्याने, येथे भक्त निवासस्थान, मोठे सभागृह, सभामंडप, महिला शौचालय आणि गोशेड यांसारख्या पायाभूत सुविधा उभारून विकास आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.



