Uncategorized

नालंदा नगरच्या समस्यांचा कायमचा निकाल नगरसेवक गौतम भोळे यांच्या विकासकामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा

शुक्रवार १८ जून २०२६

पुर्णा (प्रतिनिधी) गुरुवार १८ जून २०२६ पुर्णा शहरातील नालंदा नगर येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची नालीची समस्या अखेर सुटली आहे. प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक. गौतम भोळे यांच्या पुढाकाराने या परिसरातील सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.नालंदा नगरमधील बलबीर पास्टर आणि इंदुबाई कीर्तने यांच्या घरासमोरील भागापासून ते कावशी नाल्यापर्यंत पक्की नाली नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास होत होता. नागरिकांच्या या समस्यांची दखल घेत नगरसेवक गौतम भोळे यांनी स्वत पुढाकार घेतला. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून जे.सी.बी. च्या साहाय्याने हे काम पूर्ण करून घेतले आहे.या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, नगरसेवकांच्या या कामाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.विकास हा आमचा संकल्प, जनता आमची शक्ती या ब्रीदवाक्याला अनुसरून नगरसेवक. गौतम भोळे यांनी पुन्हा एकदा जनसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!