Uncategorized

प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड भ्रष्टाचार विरोधी समितीच्या इशाऱ्यामुळे अखेर अतिक्रमण हटाव मोहिमेची तारीख जाहीर १५ जुलैला होणार धडक कारवाई

सोमवार २९ जून २०२६

पूर्णा (प्रतिनिधी) शहरातील अतिक्रमणांकडे नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, भ्रष्टाचार विरोधी समितीने पुकारलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला अखेर कारवाईची तारीख जाहीर करावी लागली आहे. भष्टाचार विरोधी समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रमणी रामा लोखंडे यांनी ३० जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आणि १५ जुलै २०२६ रोजी धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदेला द्यावे लागले आहे. प्रशासनाचा ढिसाळपणा चव्हाट्यावरनगर परिषदेने मार्च महिन्यात फक्त रेल्वे स्टेशन समोरील काही निवडक दुकाने हटवून आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे दाखवले होते. त्यानंतर उर्वरित अतिक्रमणांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने शहरातील वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन फक्त आश्वासनांचा खेळ करत होते, ज्यामुळे नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले होते. समितीचा आक्रमक लढाप्रशासनाच्या याच चालढकल धोरणामुळे संतप्त झालेल्या तालुकाध्यक्ष चंद्रमणी रामा लोखंडे यांनी ३० जून २०२६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अर्धनग्न आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. आंदोलन अटळ असल्याचे दिसताच, मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी तातडीने हालचाली करत १५ जुलै रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. आता १५ जुलैवर लक्षप्रशासनाने कारवाईचे लेखी आश्वासन दिले असले तरी, भ्रष्टाचार विरोधी समिती आता पूर्ण तयारीत आहे. जर १५ जुलैला कारवाई झाली नाही, तर होणाऱ्या परिणामांना मुख्याधिकारीच जबाबदार असतील, असा स्पष्ट इशारा समितीने दिला आहे. १५ जुलैला होणारी ही मोहीम आता प्रशासनाची मोठी कसोटी ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!