पूर्णेत दोन आटोची समोरासमोर धडक,एकाचा मुर्त्यु तर एक जखमी

शुक्रवार.10. जानेवारी 2025
पूर्णा/ शहरातील बसस्थानक जवळील मुख्य रस्त्यावर शुक्रवार १० जानेवारी रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास दोन ऑटोंची समोरासमोर जोरदार धडक झाली. या मध्ये एक प्रवासी ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. ठार झालेली व्यक्ति पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात असलेल्या रिलॅबल अग्रो फुड्स कंपनीत कामगार म्हणून कामाला होते.
या अपघात प्रकरणी अधिक माहिती असी की, पूर्णा शहरातील बसस्थानक जवळील रोडवर शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास टि पॉईंट कॉर्नरकडून पिवळ्या रंगाचा मालवाहू छोटा हत्ती एम एच २६ ए डी ८९१४ हा ऑटो पूर्णा शहरात येत होता. त्याच वेळी दुसरा एम एच २६ के १३५३ हा रियर ऑटो पूर्णा शहरातून रिलॅबल अग्रो फुड्स कंपनीकडे जात होता. या दोन्ही ऑटोची बसस्थानकासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात रियर ऑटो मध्य बसलेले मोहम्मद शाकीर मोहम्मद मुनीर (वय ४५, मुळ रा. तडीयापूर आझमगड युपी) यांच्या हाता पायाला जबर मार लागला. उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ लक्ष्मण नाईक, डॉ अकाश उमाटे यांनी त्यांना मृत घोषित केले तर. दुसरा कामगार मोहम्मद कलाम मुळ रा. बिहार राज्य ह.मु. रिल्याबल अग्रो फुड्स कंपनी पूर्णा यांच्या हाता पायाला जबर मार लागून गंभीर जखमी झाला. त्याला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे सपोनि नांदगावकर, पोहे नळगीरकर, राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.



