परभणी

नर्सिंग बावडीत कुजलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

शुक्रवार.27. डिसेंबर 2024

पूर्णा प्रतिनिधी:- शहरातील मध्यवस्तीत नर्सिंग बावडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या विहीरीत अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आज संध्याकाळच्या सुमारास अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत आसल्याचे निदर्शनास आले आजकाळ कुठल्याही शहराच्या ठिकाणी विहीरी बघावयास ही मिळत नाहीत मिळाल्याच तर त्यांचे पाणी आटलेले आसते पण याला आपवाद आसलेली पूर्णेतील नर्सिंग बावडी नामक विहीरीला १२ महीने ईतके पाणी आसते की ही विहीर स्वच्छ ठेऊन उन्हाळाच्या काळात पाणी टंचाईच्या वेळी जर याचा वापर केला तर सगळ्या पूर्णा शहराला पाणी पुरेल इतके पाणी या विहीरीला आसताना ही नगर परिषद या कडे दुर्लक्ष करीत आसते फक्त गणपती विसर्जनच्या वेळीच ही विहीर स्वच्छ करुन गणपती विसर्जनासाठी वापरली जाते एरवी ३६४ दिवस हॉटेल,बार,देशी दारु,चिकन मटन रुग्णालय वाले त्यांची वेस्टेज टाकण्यास वापरतात आणि मद्य प्राशन करणार येणार जाणार लघुशंकेसाठी वापरतात या प्रकाराची वारंवार तक्रार करून ही या कडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष आसल्यामुळे या विहीरीत कचरा आहे की वस्तु आहे का जणावर आहे का मानवी मृतदेह हे कळण्यास कठीण आहे आसे दिसुन येत आहे दरम्यान घटनेची माहीती मिळताच पूर्णा पोलिसांनचे पथक दाखल झाले आहे सदर मृतदेहाची पाहणी करून अत्यंत कुजलेले व दुर्गंधीयुक्त मृतदेह आसल्याने पोलिसांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाला पाचारण केले या ठिकाणी बघाची गर्दी जमली होती व आनेक प्रश्न निर्माण झाले आसुन त्याचे उत्तर मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतरच मिळेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!