
संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
सोमवार.दि.23. डिसेंबर 2024
पूर्णा/रेल्वे स्थानकाच्या नांदेड कडील बाजूस दि 22 डिसेंबर रोजी पहाटे कोणत्या तरी रेल्वे गाडीने कटुन मृत अवस्थेत अनोळखी इसमाचा मुर्त्यु झाला असल्याचे माहिती पूर्णा रेल्वे स्थानकाचे स्टेशन अधीक्षक यांनी रेल्वे पोलिसांनी कळविले आहे या वरून रेल्वे पोलीस कर्मचारी सिराज पठाण,पो का अविनाश डावरे यांनी घटना स्थळी जाऊन अनोळखी इसमाचे मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून अकस्मत मृत्यूची नोंद केली आहे परंतु सदर अनोळखी इसमाची अध्यापा ओळख पटली नाहीं. सदर अनोळखी इसमाचे वर्णन वय 30 वर्ष,बांधा मजबूत, उंची 167 से मी,रंग गोरा,चेहरा गोल,दाढी संपूर्ण, ओढ शाबूत आहे,तोंड अर्धवट उघडे,डोळे अर्धवट उघडे, कान शाबूत आहे,नाक रेल्वेच्या मार लागून चिरलेली, कपाळ रेल्वेचा मार लागून फुटलेले आहे त्यामुळे अशा प्रकारे सदर अनोळखी इसमाचे वर्णन असून जर यांची कोणास ओळख पटल्यास पूर्णा रेल्वे पोलीस चौकीतील तपास अंमलदार सिराज पठाण यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान पो का अविनाश डावरे यांनी केले आहे



