पूर्णेत अवैध देशी विदेशी दारू विक्रीचा सुळसुळाट

मंगळवार.4. फेब्रुवारी 2025
पुर्णा प्रतिनिधी.पुर्णा शहर आणि तालुक्यात अवैध दारूविक्री ने कळस गाठला असुन यातून बऱ्याच नागरिकांना आरोग्याच्या गंभीर आजारांचा सामना तर रेल्वे प्रवाशांना दररोज नशेत तर्र झालेल्या तलीरामांचा नाहक टोमणेबाजीला दररोज सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या जैस्वाल वाइन शॉप येथे दिवसभर मद्यपिंची मोठी गर्दी असते यातच नांदेड परभणी आणि ईतर मोठया शहरांच्या ठिकाणी अपडाऊन करत उच्चशिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी याच रस्त्याने सकाळ संध्याकाळ ये जा करतात, त्यातच महिला, मुली यांना येथे झिंगाट झालेले मद्यपी येणारे जाणाऱ्या महिला आणि मुलींकडे बघत वेगवेगळ्या कॉमेंट करतात याकडे मात्र दर महिन्याला एका फिक्स तारखेला लक्ष्मिदर्शन होताच अशा क्षुल्लक गोष्टींकडे, तक्रारी कडे सोयीस्कर कानाडोळा करतात.
परिसरात येथूनच मोटारसायकल वरून मोठया प्रमाणात दररोज दारू खेडे, गाव आणि गल्लोगल्ली पोहोचवली जाते आणि उघड आहे हे कुणाच्या संमतीने बिनबोभाट सुरु आहे, बिचाऱ्या जनता प्रवासी आणि महिला यांना या किळसवाण्या प्रकारातून वाचण्यासाठी कूठल प्रशासन खंबीर भूमिका घेऊन हा जीवघेणा प्रकार थांबवणार असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
दारूबंदी विभाग, पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन या विषयी कुठली कार्यवाही करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे




