प्लॉट नावावर करून घेण्यासाठी वडिलांचा खुन करून पसार झालेल्या आरोपीस अटक

शनिवार.1. फेब्रुवारी.2025
पूर्णा(प्रतिनिधी)पोस्टे चुडावा हद्दीतील मौजे कलमूला येथे दिनांक 22/01/2025 रोजी 65 वर्षीय वयोवद्ध इसमास प्लॉट नावावर करून दे या करणा साठी त्याच्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी सबल मारून खून केला.
या मुळे आरोपी मुला विरुद्ध पो स्टे चुडावा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 12/25 कलम103(1),351(2)भांदवी प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करून जलद गतीने गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला आरोपीने गुन्हा करून घटना स्थळा वरून पळ काढला होता. त्यामुळे आरोपीचा शोध होणे गरजेचे होते पोस्टे हद्दीतील गावे आखाडे तसेच नजीकच्या जिल्ह्यात आरोपीचा कसून शोध घेतला मात्र त्याचा काही एक थांग पता लागत नव्हता त्यातच गुप्त माहितीगारा मार्फत मिळालेल्या माहिती प्रमाणे पो स्टे चुडावा चे एक पथक आंध्र प्रदेशात रवाना करण्यात आले या पोलीस पथकाने दिनांक 30/01/2025 रोजी निजामबाद जिल्हा, श्रीकोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील चीनम्पल्ली या अत्यन्त दुर्गम असलेल्या खेडे गावातून आरोपीस मोठया शिताफिने शोध घेऊन आरोपी नामे शेख अकबर शेख अमीन रा. कळ्मुला यास ताब्यात घेऊन पो स्टे चुडावा येथे हजर केले.
आज रोजी आरोपीस मा. न्यायालयात हजर केल्याने मा. न्यायालयाने त्यास 04/02/2024 रोजी पावेतो पी सि आर मंजूर केलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक मा श्री काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पूर्णा श्री समाधान पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोस्टे चुडावा प्रभारी स पो नि नर्सिंग पोमनाळकर, पो उप नि मुखेडकर, पोलीस अंमलदार राजेश्वर
आईटवार, विलास मिटके यांनी अल्पवधीत गुन्ह्यांची उकल करून आरोपीस जेरबंद केले आहे.त्यामुळे पोलीसाच्या या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त होत आहे



