पूर्णा तालुक्यातील कानेगाव शिवारात बिबट्याचा वावर

बुधवार.29. जानेवारी.2025
पूर्णा प्रतिनिधी:- तालुक्यातील कान्हेगावांपासून दीड किमी अंतरावर असलेल्या पूर्णा नदीपात्रालगतच्या शिवारात बुधवारी ता. २८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काही रेती तस्कर नदीपात्रातून रेती उपसा करून ती वाहनात भरून घेऊन जात असताना वाटेत बिबटा शिकार करण्याच्या हेतूने दबा धरुन बसला त्यांच्या निदर्शनास आला परंतु समोरील टिप्परच्या प्रकाशामुळे त्याला समोरचे काही दिसत नसल्याने टिप्पर मधील लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याची काही व्हिडिओ आणि फोटो काढले व त्यांनी तेथून काढता पाय घेतला परिसरात बिबट्या आल्याचे वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थांनी शिवारातील असलेल्या आपापल्या आखाड्यावरील जनावरे घेऊन आपले गाव जवळ केले गावांमध्ये पोलिस पाटील रामभाऊ मोरे यांनी मंदिराच्या लाऊड स्पीकर मधून सर्वांना चेतावणी दिली मंगळवारी गणपूर- ममदापूर शिवारातून जाणाऱ्या रेल्वे पटरी शेजारी एका शेताखाड्यावर मध्यरात्री कोणत्यातरी अज्ञात हिंस्र पशुनेएका लहानग्या वासराची शिकार केल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले होते. परंतु परिसरातील मोकाट कुत्र्यांनी अथवा अन्य वन्यजीव प्राण्यांनी शिखर केली असावी असा गावकऱ्यांचा समज झाला होता. मात्र गावातील काही लोकांनी वनविभागास याची कल्पना दिली वनविभागाने पाहणी करुन शिकार वाघ बिबट्या सुदृश्य प्राण्यांनीच केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता व बुधवारी रात्री रेती तस्करांच्या निदर्शनास बिबटा आल्याने त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळतात वनविभागाचे अधिकारी अंगद आयनाळे हे घटनास्थळाकडे आपल्या पथकासह तातडीने खाना झाले असल्याची माहिती आहे. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शेत आखाड्यावर नागरिकांनी समुहाने रहावे. न घाबरता पशुधनाची घ्यावी, एकट्याने सुनसान किंवा नदीपात्रालगत फिरु नये असे आवाहन त्यांनी केले आहे.




