Uncategorized

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम तात्काळ सुरू करण्याची मागणी

पूर्णा /शहरातील महावीर नगर मध्ये असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम तात्काळ सुरू करण्यात यावे व बँकेतील बीसी बँक मित्र यांना हटवण्यात यावे अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख अक्रम शेख हबीब यांनी बँकेचे शाखा प्रबंधक यांच्याकडे दि.२८ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे शहरातील महावीर नगर परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र येथील एटीएम सुविधा मागील बारा महिन्यांपासून बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून ग्राहकांना पिन जनरेट करण्यासाठी नांदेड किंवा परभणीला जावे लागत आहे वय वृद्ध नागरिक रेल्वे पेन्शनर शेतकरी व शाळकरी मुला-मुलींना एटीएम सुविधा सुरू नसल्यामुळे आर्थिक भुर्दंड होत आहे व तसेच बँकेत असलेले बँक मित्र बीसी यांना तालुक्यातील वाईलासीना येथील परिसर देण्यात आला असून ते शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत कोणाच्या आशीर्वादाने बसत आहेत कोणत्या नियमाने बसवण्यात आली आहे यामुळे बँककेत मोठी गर्दी होत आहे बँकेत पैसे चोरींच्या घटना घडत आहेत बँकेचे कॅशियर हे सुद्धा ग्राहकांना बीसी यांच्याकडून पैसे काढणे किंवा भरणे व्यवहार करण्यास सांगत सांगत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे असे निवेदनात नमूद केले आहे एटीएम सुविधा सुरू करण्यात यावी व तसेच बीसी बँक मित्र यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख अक्रम शेख हबीब यांनी निवेदनाद्वारे केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!