Uncategorized

पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत वाचा दोष निर्मुलन शस्त्रक्रियेचे शिबिर संपन्न

मंगळवार.28. जानेवारी 2025

पुर्णा (प्रतिनिधी)राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत १८ वर्षांखालील वयोगटातील वाचा दोष( टंग टाई) असलेल्या बालकांवर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित मोफत वाचा दोष निर्मुलन शस्त्रक्रियेचे शिबिर मंगळवारी २८ रोजी येथिल ग्रामीण रुग्णालयात पार पडले.यावेळी तालुक्यातील सुमारे २० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती रुणालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण नाईक यांनी दिली आहे. पूर्णा ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत मंगळवारी सकाळी वाचा दोष(टंग टाईप) आजार निर्मुलन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी टंग टाई तज्ञ डॉ.तेजस तांबोळे व डॉ.विनोद अर्जुन,डॉ.लक्ष्मण नाईक,गट शिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.प्रसंगी डॉ.रेखा चव्हाण,डॉ.नागेश देशमुख,डॉ.कानडकर,डॉ.ऋषिकेश ठाकूर,विस्तार अधिकारी नेटके आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ.लक्ष्मण नाईक म्हणाले की येथील ग्रामीण रुग्णालयात अधून मधून वाचा दोष निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात येते.शिबीरात शून्य ते अठरा वयोगटातील श वाचादोष असलेल्या मुलांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते.नुकतेच शिक्षण विभागाच्या सोबतीने शोध मोहीम घेण्यात आली होती .यामध्ये वाचा दोष असलेल्या २० बालकं मआढळून आले त्या सर्वांवर तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते शिबिरात वाचा दोष निर्मूलन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.यापुढेही वाचा दोष असलेल्या बालकांचे मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाचे अब्दुल वहीत फारुकी,महेंद्र मकरंद,रवी वाघमारे,बापूराव कदम,सिंड्रेला झांबरे,दीपिका चव्हाण नंदा भिसे,शिक्षण विभागाचे नागनाथ जाधव,संदेश भरणे, व्यंकटरमन जाधव,योगेश देशमुख,बाबा सुरकुटे,अनिल मंगनाळे,बालाजी सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!