Uncategorized

हॉर्टिकल्चर या विषयात डॉ.कल्याणी देशमुख याना पीएचडी संपादन

रविवार.26. जानेवारी.2025


पूर्णा(प्रतिनिधी) डॉ.कल्याणी दिलीपराव देशमुख हिने एग्रीकल्चर मध्ये हॉर्टिकल्चर या विषयात पीएचडी संपादन केली असून तिला सर्वप्रथम गुणांक मिळाला त्यासाठी तिला मार्गदर्शक म्हणून कठोर मेहनत घेणारे डॉ.विश्वनाथ खंदारे.विभाग प्रमुख हॉर्टिकल्चर विभाग,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी व तसेच त्यांचे सहकारी डॉ.श्री बगले सर डॉ.श्री भोसले सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शनाखाली भेंडी या पिकावर संशोधन केले त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची “Parbhani Super Kranti” ही भेंडी व्हरायटी गेल्या जून 24 मध्ये डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या ठिकाणी झालेल्या प्रदर्शनामध्ये सर्व विद्यापीठातून प्रथम गुणांनु क्रमांक मिळाला. त्यासाठी तिच्या विद्यापीठांमध्ये तिचे कौतुक करण्यात आले आणि काल दि. 23 जानेवारी 2025 मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचा 26 वा दीक्षांत समारंभामध्ये माननीय महामहिम श्री राधाकृष्णन, राज्यपाल महाराष्ट्र राज्य व विद्यापीठाचे कुलगुरू श्री इंद्रमणी यांच्या हस्ते पदवीदान समारंभामध्ये पी. एच.डी.पदवी बहाल करण्यात आली त्यानिमित्ताने विद्यापीठातील अ. डायरेक्टर डॉ.श्री गजाननराव भालेराव, डॉ. श्री जय देशमुख,माजी एक्सटेंशन ऑफिसर श्री विश्वनाथरावजी तावडे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व तसेच परभणीचे खासदार संजयरावजी जाधव, आमदार राहुलजी पाटील, आमदार राजेंद्र विटेकरजी व माननीय मंत्री सौ मेघनाताई बोर्डीकर तसेच परभणी शहरातील क्रीडा शिक्षक सुशीलरावजी देशमुख ,परभणी शहरातील मान्यवर व वृंदावन व नंदनवन कॉलनीतील सर्व जनतेने अभिनंदन केले त्याचप्रमाणे नुकत्याच वाशिम या शहरांमध्ये रहिवासी असलेल्या सुंदर वाटीकेतील सर्व प्रतिष्ठित लोकांनी गुणगौरव व तिच्यासोबत तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला, सर्व नातेवाईक, डोंगरकिन्हीकर परिवार आदी जण उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!