जमियत उलमा पूर्णा यांच्या अध्यक्षते खाली तहसिलदार व पोलिस निरीक्षक पूर्णा यांना निवेदन

गुरुवार.12. फेब्रुवारी.2024
पूर्णा(,प्रतिनिधी)सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील 04 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग बलात्कार करुन तिचा खून करणाऱ्यां दोर्षीना फासी शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जमियत उलमा पूर्णाच्या वतीने तहसीलदार तथा पोलिस निरक्षक यांना देण्यात आले
सांगली जिल्हयातील जत तालुक्या मध्ये 04 वर्षाच्या मुस्लीम मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केला आहे. अशा दोर्षीना फास्ट ट्रक पध्दतीने खटला चालवून दोषींना तात्काळ फासीची शिक्षा देण्यात यावी. अशा घटना बाबत प्रशासनाने योग्य तो कायदा बनविण्यात यावा. या करीता पूर्णा तालुका व शहरातील नागरीकांकडून वरील प्रकरणा बाबत समस्त मुस्लीम समाजा तर्फे तिव्र निषेध व्यक्त करून
या प्रकरणी पूर्णा तालुक्यातील सर्व मुस्लीम बांधवा तर्फे आमच्या भावना प्रशासना पर्यंत पोहचविण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात नमूद केलं असून सदर निवेदन नायब तहसिलदार थारकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहारे मॅडम,पोलीस उपनिरीक्षक रखोंडे मॅडम याच्या मार्फत दिलं आहे या निवेदना वर
अर्जदार समस्त नागरीक
शेख सोहेल शेख खुदुस,शेख जावेद शेख मन्नान, शेख इम्रान शेख सलीम,मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक,शेख अमजद राऊफ,विरेश कसबे, शेख बिलाल,इरफान बागवान,इम्रान बागवान, जमीर पठाण,अफझल खान,जुनेद बागवान,सद्दाम कुरेशी,अमीर कुरेशी,सद्दाम, सह आदिंचे स्वाक्षऱ्या आहेत




