
संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
दि.26.09. सप्टेंबर.2024
परभणी/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनचे २४ सप्टेंबर २०२५ रोजी आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात संपविण्यात आलेला आहे दिलेल्या मुदतीमध्ये मुस्लिम आरक्षण ची मागणी पूर्ण नाही झाली तर सखल मुस्लिम समाज हे आंदोलन करतील या ५६ दिवसाच्या कालावधीमध्ये विविध पक्षाचे समर्थन हा उपोषणास भेटलेले आहे. सफल मुस्लिम समाजाच्या एक शिष्ट मंडळ मुंबई येथील मंत्रालय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उपोषणाची माहिती दिली त्यांच्या आश्वासना नंतर हा साखळी उपोषण तात्पुरते स्वरूपात मागे घेण्याचा निर्णय
करण्यात आला.
परभणी पालक मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी सुद्धा भेट देऊन शासन दरबारी मुस्लिम समाजाला आरक्षण आणि इतर ही मागण्या संधर्भात पाठपुरावा केला होता. त्यास वन्वाच प्रमाणत यश आलं होते.
त्यामुळे आपण हे साखळी उपोषण पासून परावृत्त व्हावे असे अजित दादा यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला म्हणून
तात्पुरते हे आंदोलन स्थगित करण्यात येणार असून मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मुस्लिम समजाच्या वतीने देण्यात आली.
आरक्षण आणि मुस्लिम समाजाच्या इतर महत्वाच्या मागण्यासाठी मागच्या ५६ दिवसापासून परभणी येथील सकल मुस्लिम समाज बांधवांच्या कडून साखळी
उपोषणाला सुरुवात केली होती. या उपोषणाला सर्वच स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांनी या साखळी उपोषणाला भेटून आपला पाठिंबा दर्शविला होता. या वेळी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्त्यांना २५ सप्टेंबर रोजी पत्र देण्यात आले आहे.
यावेळी सुभाष जावळे, शेख नासेर, यशवंत मकरंद विश्वजीत वाघमारे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या उपोषणामध्ये मध्ये अॅड. इम्तियाज खान, जाफर खान मुसा खान, शेख अखिल शेख रहीम, मुहसीर असरार, काजी अन्सारोद्दीन, सायद सगीर, मौलाना मुफ्ती जहांगीर नदवी, मौलाना जहीर अब्बास कासमी, छटू भाई गुत्तेदार यांचा सहभाग होता.



