आयशर ची मोटरसायकलला जोरदार धडक चार जण जखमी अपघातात लहान मुलांचाही समावेश

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
सोमवार .दि.16.9.2024. सप्टेंबर

पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील परभणी ते वसमत रोडवर झिरोफाटा या ठिकाणी असलेल्या टि .पॉईंटवर आयशरची मोटारासायकला जोरदार धडक.वसमतच्या दारेफळ येथील चारजण गंभीर जखमी . पुर्णा तालूक्यातील झिरोफाटा येथील टि पॉईंट कॉर्नरवर १६ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी आयशर व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होवून धडकेत मोटारसायकल वरील चारजण गंभीर जखमी झाले.जखमींना पुढील उपचारासाठी परभणी ला पाठवले. ,पूर्णा तालूक्यातील झिरोफाटा येथील टि पॉईंट कॉर्नर येथे परभणीकडून आयशर (क्रमांक एम एच २६ बीई,९६९४ हा भरधाव वेगात वसमतकडे जात असताना औंढा ईकडुन येणारी मोटारसायकल चालकाला वाचविण्याचा प्रयन्तात समोरुन परभणीच्या दिशेने येणा-या एक दोन मोटारसायकल येत असताना या पैकी कौडगाव ता पूर्णा येथील एक मोटारसायकल क्र.एम एच २२ ए एल ४००७ हीस चुकवताना दुसरी मोटारसायकल क्रमांक एम एच ३८ के ३६५९ हीस आयशरची जोरदार धडक बसली.या भिषण अपघातात दारेफळ ता वसमत जि हिंगोली येथील रहिवाशी असलेले तथा मोटारसायकल चालक शिवाजी गोविंदराव खरबडे (वय ३६),गिता शिवाजी खरबडे (वय ३२) सान्हवी शिवाजी खरबडे (वय ९),अनूष्का शिवाजी खरबडे या एकाच कुटूंबातील असलेल्यांना जबरदस्त मार लागून गंभीर जखमी झाले.अपघात एवढा मोठा होता की धडकेत ते मार लागून बाजूला जावून रक्तबंबाळ बेशूध्द अवस्थेत पडले.दरम्यान,तेथील नागरीक मदतीला धावून जात पूर्णा पोलीसांनी जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवले आहे.या पैकी गिता खरबडे यांची प्रकृत्ती चिंताजनक सांगीतले जात आहे. या अपघात लहान मुलांचा देखील समावेश आहे दरम्यान,अपघाताची माहीती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोउनि श्रिनिवास पडलवार,पोहे श्याम काळे,पोह मंगेश जुक्टे,एरंडेश्वर पो पाटील बापूराव राऊत यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली.



