अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटवून खुनाचा गुन्हयातील आरोपींना ४८ तासात अटक

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
सोमवार.16.9.2024. सप्टेंबर
पुर्णा शहरातील विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या पडीक जागेत काटेरी झुडूपांमध्ये, पूर्णा येथे एका ४५-५० वयोगटातील अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले होते. तिच्या तोंडावर, डोक्यात गंभीर जखमांवरून सदर महीलेचा खून झाला असल्याचे दिसून आल्याने . पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ मा. अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जीवन बेनीवाल भापोसे उपविपोअ जिंतूर चार्ज पूर्णा, अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थागूशा परभणी यांना मार्गदर्शनकरून स्टाफसह घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सोबत फॉरंन्सीक टिमला रवाना केली होती. यावरून श्री जीवन बेनीवाल भापोसे सहाय्यक पोलीस अधीक्षक, अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्वागूशा परभणी यांनी स्वागूशाचे पी. डी. भारती सपोनि व अंमलदार रंगनाथ दूधाटे, हनूमान ढगे, सचिन भदगें, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड यांना सोबत घेऊन सदर गुन्हयाचे घटनास्थळाला भेट दिली. सदर गुन्हयातील घटनास्थळाची फॉरन्सीक टिमसह बारकाईने पाहणी केली. तसेच पारंपारीक तपास पध्दती व गूप्त बातमीदारांकडून मयत महीलेचा फोटो व्हॉटसअॅपवर व्हायरल करून यातील मयत महीला ही रमाबाई भ्र. अनिल चिकाटे वय ५० वर्षे रा. विजयनगर पूर्णा हि ओळखदाराकडून असल्याचे निष्पन्न केले. सदर प्रकरणी यातील मयत महीलेचा मूलगा नामे श्याम अनिल चिकाटे वय २९ वर्षे व्यवसायः- मजूरी रा. सिध्दार्थनगर पूर्णा याचे फिर्यादयसन पो. स्टे. पूर्णा येथे गूरनं ३११/२४ कलम १०३(१), २३८ भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.सदर गुन्हयाचा स्थागूशा परभणी व पो. स्टे. पूर्णा यांचेकडून संयूक्तपणे तपास सुरू असताना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा माणिक मूळे रा. पूर्णा याने त्याचे साथीदारसह केला आहे. सदर माहीतीवरून आरोपी नामे १) माणिक रामचंद्र मूळे वय ४० वर्षे रा. शिवाजीनगर पूर्णा यास ताब्यात घेऊन त्याचेकडे विश्वासाने विचारपूस केली असता, यातील माणिक मूळे व मयत महीला नामे रमाबाई चिकाटे हिचे दारू अडडयासमोर दारू पिण्याचे कारणावरून वाद झाला होता. सदर महीलेने त्याला दास घेण्यासाठी दहा रूपये मागितले असता, त्याने तिला दहा रूपये न दिल्याने तिने त्याला चप्पलने मारले. त्याचा राग मनात धरून आरोपी याने दारू पाजण्याचे बहाण्याने रेल्वे पटरीच्या बाजूला मोकळ्या जागेत नेले व त्या दोघांनी दारू पिली. त्यावेळी त्या ठिकाणी माणिक मूळे याच्या ओळखीचे दोघेजन तिथे आले. त्या चौघांनी मिळून एकत्रीत दारू पिली व सर्वांसमक्ष चपलेने मारल्याच्या कारणावरून तिच्या तोंड व डोके देगडाने ठेचून मारून तिचा खून केला व पूराचा नष्ट करण्याच्या उददेशाने तिचा मृतदेह तिघांनी फरपटत आणून काटेरी झुडूपात फेकून दिलानमूद महीलेच्या खूनामध्ये आरोपी नाम १) माणिक रामचंद्र मूळे वय ४० वर्षे रा. मूळेगल्ली शिवाजीनगर पूर्णा २) आवेज कुरेशी युसुफ कुरेशी वय ३० वर्षे ३) शादुल कुरेशी युसुफ कुरेशी वय २६ वर्षे दोन्ही रा. कुरेशी मोहल्ला, पुर्णा यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर तिन्ही आरोपींना स्थागूशा पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांना पूढील कायदेशीर कार्यवाहीस्तय पो. स्टे. पूर्णा यांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी . पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी भापोसे यांचे मार्गदर्शनाखाली . अपर पोलीसअधिक्षक यशवंत काळे यांचे नेतृत्वात जीवन बेनीवाल भापोसे उपविपोअ जिंतूर चार्ज पूर्णा, अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थागूशा परभणी, विलास गोबाडे पोलीस निरीक्षक पूर्णा, पी. डी. भारती सपोनि स्थागूशा परभणी, रामकिशन नांदगावकर सपोनि, पोउपनि चंदनसिंह परीहार, पोउपनि प्रकाश इंगोले, पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भवरगे, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, साहेब मानेबोईनवाड, अजय माळकर, संदीप चौरे, मंगेश जूकटे, रमाकांत तोटेवाड, गणेश कौटकर, प्रशांत लटपटे, स्वप्नील पोतदार यांनी पार पाडली आहे. यातील अनोळखी मयत महीलेच्या खूनाची उकल सत्वरतेने केल्याने . पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.



