स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांचा छापा कारवाईत ८,३२,६४० /- रुपयाची अवैध गुटखा मुददेमाल जप्त व एक आरोपी ताब्यात

दि. १४/०९/२०२४ . सप्टेंबर
संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
प्रतिनिधी परभणी
पोलीस अधिक्षक रवींद्र सह परदेशी, यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक .अशोक घोरबांड स्थानिक गुन्हे शाखा, परभणी स.पोलीस निरीक्षक. राजु मुत्येपोड पोह/४५९, पोउपनी चंदनसिंह परीहार, रवी जाधव, पोशी / १६८८ शेख रुफीयाददीन, पोह/१०७८ वीलास सातपुते, पोशी/१६३३ निलपत्रेवार, पोशी/११५६ परसराम गायकवाड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी पोलीस स्टेशन गामीण हद्दीत अवैदय धंदयावर कारवाई करण्याकरीता खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असतांना ठिक १९.३० वाजता पेडगाव येथे एका विना नंबरचे बुलेरो वाहनात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली गुटखा चोरटी विकी करण्याकरीता घेउन आला असून सदर वाहन आरोपीच्या घरासमोर लावुन असल्याचे मुखबीरच्या खबरेवरून पेडगाव येथील सदर विना नंबरचे बुलेरो वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात खालील पमाणे मुददेमाल मिळुन आला आहे
) २,६६,११ / रू ची राजनिवास सुगंधीत पान मसाला असे नाव असलेले १३८६ पुडे पत्येकी १९२ रू पमाणे २)६६५२८/ रू ची झेड एल ०१ जाफरानी जर्दा असे नाव असलेली १३८६ पुडे पत्येकी ४८ रूपमाणे
१ ३)५,००,०००/ रू ची एक पांढऱ्या रंगाची महीदा कंपणीची बोलेरो एक्स एल ५ असे मॉडेल असलेले पासींग कमांक नसलेली गुटखा वाहतुकीकरीता वापरलेले वाहन असे एकुण ८,३२,६४० रू चा मुददेमाल मिळुन आल्याने सदर मुददेमाल व आरोपी नामे १) रेणुकादास शुभम अकोलकर वय २८ वर्षे रा. पेडगाव जि परभणी यांना ताब्यात घेण्यात आले व आरोपीस मालाबाबत विचारले असता त्याने सदर माल हा त्याचा भागीदार २) जगन्नाथ टेकाळे रा.आळंद ता. जि.परभणी याचा असल्याचे सांगीतले तसेच सदर माल हा ३) संदिपशेट रा. रावराजुर जि.जालना याचेकडुन विकत आणल्याचे सांगुन तो माल झरी येथील ४) विकास देशमुख, पेडगाव येथील ५) रमा गायकवाड, ६) समीर शेख आझमचौक परभणी यांना पुरवठा करतो असे सांगीतल्याने सदर सर्व आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन परभणी गामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोउपनी चंदनसिंह परीहार हे करीत आहेत.
वर नमुद कारवाईत पोलीस अधिक्षक श्री रविंन्सिंह परदेशी, यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक श्री यशवंत काळे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड स्थानिक गुन्हे शाखा, परभणी, व त्यांची टिम श्री.सपोनी राजु मुत्येपोड, पोउपनी चंदनसिंह परीहार, पोह/४५९रवी जाधव, पोशी / १६८८ शेख रुफीयाददीन, पोह/१०७८ वीलास सातपुते, पोशी/१६३३ निलपत्रेवार, पोशी/११५६ परसराम गायकवाड यांनी कारवाई केली आहे



