
संपादक जाकीर पठाण संपर्क साधा 9975162200
गुरुवार.दि.12. डिसेंबर.2024
(परभणी प्रतिनिधी)
दि. ०३.१०.२०२४ रोजी २३.०० वा. ते दि. ०४.१०.२०२४ रोजीचे ०३.०० वा. चे दरम्यान धनगर टाकळी येथून यातील फिर्यादी नामे शरद किशनराव जोगदंड रा. सारंगी ता.पूर्णा यांचे टिप्पर क्र. MH48TR942014 कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चारून नेल्या प्रकरणी पो. स्टे. चूडावा गूरनं ३०३(२), ३(५) भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याबाबत रविंद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी यांनी अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थागूशा परभणी यांना सूचना दिल्या होत्या.सदर गुन्हयाचा पो.स्टे.चूडावा व स्थागूशा परभणी यांचेकडून समांतर तपास सूरू असताना, अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थागूशा परभणी यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की,सदरचा गुन्हा शेख सलीम, बापूराव डूकरे, निखिली ढगे तीन्ही रा. धनगर टाकळी ता.पूर्णा यांनी त्यांच्या साथीदारांनी मिळून केला आहे.अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने अशोक घोरबांड यांनी स्थागूशाचे पथक तयार करून,सदर आरोपींचे शोधकामी रवाना केले. सदर पथकाने सदर तीन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत विचारपूस केली असता,त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगून, सदर टिप्पर शेख जमील शेख गुलाब रा. अहमदपूर जि. लातूर याला विक्री केल्याचे सांगितल्याने सदर टिप्पर क्र. MH48TR942014 हे जप्त करण्यात आले आहे.सदर गुन्हयात चार आरोपींना ताब्यात जप्त मूददेमालासह पूढील कायदेशीर कार्यवाहीस्तय पो.स्टे.चूडावा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली व .अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे मपोसे व समाधान पाटील उपविपोअ पूर्णा यांचे नेतृत्वात अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थागूशा परभणी, पी. डी.भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थागूशा परभणी, पोउपनि चंदनसिंह परीहार, पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भदरगे, राहूल परसोडे, लक्ष्मण कागणे, हनुमान डगे, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, उत्तम हनवते, सायबर सेलचे पोलीस अंमलदार मोहम्मद शारेक, गणेश कौटकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. अपर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.



