पूर्णा तालुक्यातील नदीपात्रातून अवैध रेती उपसा चालूच;महसूल प्रशासन सुस्त

संपादक जाकीर पठाण 9975162200
रविवार.दि.2.जून.2024
पूर्णा प्रतिनिधी पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथील नदीपात्रातून बोट व जेसीबी च्या साह्याने गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रातून अवैध वाळू उत्खलन करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत चोरट्या मार्गाने अवैध वाळू उपसा करुन ती गरजू लोकांना चढ्या दराने विकली जात आहे याकडे जाणिवपूर्वक महसूल प्रशासन कानाडोळा करुन वाळू माफियांना एक प्रकारची वाळू उपसा करणा-यासाठी मुभाच देत असल्याचे दिसून येत आहे.बोट व जेसीबीच्या उत्खलन करून वाळूचा अवैध धंदा जोमात सुरु असून पिंपळगाव बाळापुर नदीपात्रातून दररोज शेकडो टिप्पर च्या साह्याने दिवसाढवळ्या वाळू वाहतूक करणारे टिप्पर सर्रास चालू आहेत. दररोज हजारो ब्रास वाळू उपसा होत आह वाळूची वाहतूक करण्यासाठी रस्त्यात कुठेच अडथळा येवू नाही म्हणून टिप्पर मालक व वाळू माफियांनी जागोजागी मोटारसायकलवरून लोकेशन माहिती देण्यासाठी माणसे नियुक्त केले आहे.तसेच अवैध वाळू वाहतुकीसाठी छुप्या पध्दतीने पोलीस देखील वाळू माफिया सोबत आर्थिक हित संबंध जोपासत वाळू वाहुतीकीस पाठबळ देत असल्याचे जनतेतून चर्चिले जात आहे. महसूल पथकाने या आधी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक वाहने पकडून कारवाया केल्या होत्या.त्यावरून महसूल अधिका-याने जरब निर्माण केली. आणि आता मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समोरून शेकडो टिप्पर वाहतूक करीत असून यावर कारवाई का करत नाहीत यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे वाळू माफीयांना बोट व जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करण्याचा गोरखधंदा जोरात चालू असल्याने नदीपात्रात वाळूची अवैध उत्खलन करून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत असे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ सांगत आहेत.या सर्व बाबीकडे तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांचे लक्ष का नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे याकडे विभागीय आयुक्त यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे




