पूर्णेत पोलीस अधिक्षक पथकाची मोठी कारवाई अमृत नगर येथे पाच लाखाचा गुटखा जप्त

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
रविवार.दि.8. सप्टेंबर.2024
पूर्णा/प्रतिनिधी
पुर्णा शहरातील गजबजलेल्या वस्तीमध्ये असलेल्या अमृत नगरात पो अधीक्षकानी आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पाठवून एका घरात धाड टाकून तब्बल पाच लाख रुपये किमतीचा अवैधरित्या विक्रीसाठी बाळगून ठेवलेला गुटखा जप्त केला असून याप्रकरणी दोन जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की मागील काही दिवसापासून पूर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने शहरातील गल्लीबोळामध्ये अवैध्य देशी दारू ,मटका, जुगार अड्डे,अवैध वाहतूक सह सर्व अवैध धंदे सुरू आहे नुकतेच शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या अमृत नगर परिसरातील एका व्यापाऱ्याच्या घरी
दिनांक 8 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपी पवन कुमार द्वारकादास मोदींना यांच्या घरावर परभणी जिल्हा स्थानिक गुना शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंग राम सिंग परिहार , सचिन भदरगे, परसराम गायकवाड, हनुमान ढगे, रंगनाथ दुधाटे, सिद्धेश्वर चाटे, राम पौळ, नामदेव डूबे, दिलीप निल बदरेवार, जयश्री आव्हाड, या स्थानिक गुन्हा शाखा पथकाने व पुन्हा पोलीस स्टेशन येथील स.पो.नि.सोमनाथ शिंदे, पी एस आय प्रकाश इंगोले, अण्णा मानेमोईनवाड , पी एस आय रामकिशन चव्हाण , अजय माळकर आसे स्थानिक गुना शाखा अधिकारी कर्मचारी व पूर्णा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने घरी छापा मारला असता त्याच्या घरामधूनचार पोत्याच्या बोऱ्या ज्यामध्ये राजनिवास सुगंधी पान मसाल्याची पाकीट मिळून आले तसेच दुसऱ्या बोऱ्यांमध्ये जवळपास विमल गुटखा बंदी असलेला मोठ्या प्रमाणात मिळवला त्यानंतर तिसऱ्या बोऱ्यांमध्ये विनापरवाना विना विक्रीसाठी असलेला जर्दा मोठ्या प्रमाणात दिसून आला तर काही ठिकाणी प्रतिबंधित असलेल्या गुटखा मोठ्या प्रमाणात पथकाला मिळून आल्या त असा मिळालेला माल पाहून पथक चक्रावून गेलेत दरम्यान या जप्त केलेला गुटखा तब्बल 4 लाख 87 हजार 778 रुपये किमतीचा आहे याप्रकरणी आरोपी पवन कुमार द्वारकादास मोदानी राहणार आनंदनगर ,आरोपी सय्यद हसन सय्यद अली याच्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात कलम 123 223 274 275 49 कलम 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हा अन्वेषण शाखा व स्थानिक पथक करत आहे दरम्यान पूर्णेत सर्वत्र अवैध धंदे पोलीस निरक्षक विलास गोबाडे व बिट जमादाराच्या आशिर्वादाने बोकाळले आहे त्यामुळे परभणी पथकाच्या या धाडी मुळे स्थानिक पोलिसांनी चांगलीच चपराक मानली जात आहे



