सामाजिक

पिंपळा लोखंडे येथील डांबरकीरण रस्त्याचे काम थातुरमातूरगूत्तेदारास मुख्यमंत्राी ग्राम सडक योजनेच्या अभियंत्याचे पाठबळ

रविवार दि.2.जून.2024

पूर्णा:-प्रतिनीधी:-तालूक्यातील पिंपळा लोखंडे येथील गावाअंतर्गत असलेल्या दिड किमी अंतराच्या रस्त्याचे मुख्यमंत्राी ग्राम सडक योजनेतील काम सबंधित कंत्राटदाराने मजबुतीकरण,खडीकरण,नळकांडी पूल,गावातील सिमेंट काँक्रीट रस्ता,प्रथम डांबीकरण थर, खरबडमरबडीत थातूरमातुरपणे अंदाजपत्रकाला फाटा देत करण्यात आल्याचे दिसून येत आहे.या कामासाठी ७७ लाख ६२ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सदर कामावर मुख्यमंत्राी ग्राम सडक योजनेसाठी नियुक्त असलेले बांधकाम अभियंता हे अंदाजपत्रका प्रमाणे काम करुन न घेता कंत्राटदाराची पाठराखण करीत असल्याची ओरड नागरीकातून होत आहे. सदरील रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम बरोबर केले नाही,त्यावर अंदाजपत्रका प्रमाणे मेटल भरले नाही.साईडभरमचे काम अर्धवट सोडून दिले.नळकांडी पुलाचे कामही मजबुत केले नाही.ईस्टिमेट मधील गावातला सिमेंट रस्ता पकावट केला नाही. शिवाय डांबरीकरणाच्या पहिल्या टप्याचे काम थातूरमातुरपणे केले.यावर मुख्यमंत्राी ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता व कामावर नियुक्त बांधकाम अभियंता यांच्या हलगर्जिपणामुळे शेवटचा डांबरकीरण कोटही टाकला नाही.थातूरमातुरपणे काम करुनही चांगल्या दर्जाचे काम झाल्याची बतावणी बांधकाम अभियंता करीत‌ असून कंत्राटदाराची पाठराखण करुन एम बी रेकार्ड तयार करुन बिल हडप करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.निकृष्ट दर्जाच्या कामा विषयी सरपंच व ईतर कोणीही बांधकाम अभियंता यास विचारले असता ते उध्दट वागणूक देवून कंत्राटदारा विरुध्द तक्रार करण्याची धमकी देत आहेत.त्यामुळे या रस्त्याचे काम अंदाजपञका प्रमाणे होणे धुसर दिसून येत आहे. अभियंता हे मस्तवाल पणाचे उत्तर देवून सरपंच पतीसह आम नागरीकांना तुम्हाला काय करायचे ते करा,म्हणून दादागीरीचा आव‌ आणित आहेत.या रस्त्याच्या कामाची सबंधित खात्याच्या वरिष्ठ गुणनियंत्रण पथकाने येवून पाहणी करावी,असी मागणी गावक-यातून होत आहे .जोपर्यंत अंदाजपञकानूसार काम होत नाही तो पर्यंत अभियंत्याने कामाची एम बी करु नये असेही नागरीक सांगत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!