सामाजिक

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 वा महापरिनिर्वान दिनाच्या निमिताने पूर्णत अभिवादन सभेचे आयोजन

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

गुरुवार. 5 डिसेंबर.2024

पूर्णा प्रतिनिधी :-

पुर्णा येथे भारतरत डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमिताने बोधीसत्व डॉ बिआर आंबेडकर बुद्ध विहार समितीव भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे या निमिताने सकाळी ९:३० वा डॉ आंबेडकर चौक येथे उपासक अमृत मोरे यांच्या ध्वजारोहन करून अर्ध्यावर उतरवण्यात येईल दुपारी १२ वा बुद्ध विहार येथे सामुहिक बुद्धवंदना व त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गावरून डॉ आंबेडकर चौकापर्यंत डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेची शोक मिरवणूक निघेल व डॉ आंबेडकर चौक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सभेच्या अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड प्रमुख वक्ते म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे ऑडीटर युवराज मोरे दुसरे वक्ते म्हणून रिपब्लिकन नेते प्रकाश कांबळे मार्गदर्शन करणार आहेत त्या नंतर सायं ६ वा डॉ आंबेडकर नगर येथुन मेणबती ज्योत रॅली निघणार आहे या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ बीआर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समितीव भारतीय बौद्ध महासभा पूर्णा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!