निंभोरे येथील दुहेरी खुनाच्या प्रकरणात अवघ्या 10 तासांत आरोपींला ठोकल्या बेड्या, फलटण ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे पोलिसांची कामगिरी

संपादक जाकीर पठाण 9975162200
(संभाजी पुरीगोसावी सातारा जिल्हा प्रतिनिधी)
सातारा :-जिल्ह्यातील फलटण तालुक्यांतील निंभोरे गावामध्ये दुहेरी खुनाची घटना घडली होती. यामध्ये बहिण भावाचा खून झाल्याने निंभोरे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा तपास फलटण ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे टीम करीत होती. यामध्ये सिकाबाई तुकाराम शिंदे (वय 30) आणि सुमित तुकाराम शिंदे (वय 20) असे खून झालेल्याची नावे आहेत. हे दोघेही भाऊ-बहीण आहेत असे पोलिसांनी नमूद केले आहे. सदर गुन्हेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करून मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा छडा फलटण ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 10 तासांत आरोपींला बेड्या ठोकल्या आहेत. सदर आरोपींचे मयत सिकाबाई तुकाराम शिंदे हिच्याबरोबर तो राहत होता. या दोघांचेही अनैतिंक संबंधात रूपांतरण झाले होते. यातून आरोपींने हे पाऊलं उचलल्याचे पोलीस तपासांत समोर आले आहे. सदर आरोपी बाबत पोलिसांनी कसून तपास करत. फलटण ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने अखेर आरोपीला ता. कोरेगांव सातारा रोड येथून ताब्यांत घेवुन पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने खुनाच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. रणजित मोहन फाळके (वय 45) रा. सातारारोड कोरेगांव असे आरोपींचे नाव आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक स.पो.नि. नवनाथ रानगट अशोक हुलगे रोहित करणे पोलीस उपनिरीक्षक विश्वांस शिंगाडे पो. अं. मोहन डांगे पांडुरंग हजारे बबन साबळे महादेव भिसे शिवाजी गुरव आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुनील महाडिक यांनी केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस करीत आहेत.



