अडीच कोटी फसवणूक प्रकरणी बिल्डर गणेश कोंढरे यास पोलीस कोठडी

संपादक जाकीर पठाण 9975162200
(पुणे जिल्हा प्रतिनिधि संभाजी पुरीगोसावी)
पुणे : – सुभाष काशिनाथ सूर्यवंशी यांना बिल्डर नामे गणेश कोंढरे यांच्याकडूंन आंबेगांव निपाणी वस्ती जांभुळवाडी रोड यांच्याकडून प्लॉटिंग संदर्भात माहिती मिळाली. त्यावेळी सुभाष सूर्यवंशी यांनी सदर फ्लॅाटमध्ये तीन गुंठे क्षेत्रफळ असलेला प्लॉट बुकिंग करण्याचे ठरवले त्यामध्ये एक गुंठ्याचा ९,००,०००/- प्रमाणे तीन गुंठेतील २७,००,०००/- असा व्यवहार ठरला होता. दिनांक १७/०१/२०२१ रोजी ठरल्याप्रमाणे सुभाष सूर्यवंशी यांनी २२,०००/- रोख स्वरूपात देऊन प्लॉटची बुकिंग केली व त्यांना त्याबाबत पावती मिळाली. त्यानंतर सुभाष सूर्यवंशी यांनी गणेश कोंढरे जी के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने आजतागायत रक्कम २२,००,०००/- प्लॉटचे खरेदी करता दिली. त्यानंतर सुभाष सूर्यवंशी यांनी प्लॉट देण्यासाठी गणेश कोंढरे त्याबाबत जाब विचारला असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून प्लॉट देण्यास नकार दिला व गणेश कोंढरे यांनी सुभाष सूर्यवंशी यांचे नावे धनादेश दिला परंतु तो जमा झाला नाही. तसेच सदर बिल्डर गणेश कोंढरे यांनी सुभाष सूर्यवंशी व इतर २२ गुंतवणूकदाराची एकूण २,७१,९८,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांस भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बिल्डर गणेश कोंढरे याला २५/५/२४ रोजी न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी आरोपीची १० दिवस पोलिस कोठडी मागितली होती परंतु बिल्डर गणेश कोंढरे यांचे वकिल ॲड. अभिजित सोलनकर यांचा सर्व पुरावे हे कागदोपत्री उपलबद्ध असल्याचा युक्तिवाद मा. न्यायाधीश एस.जी. बर्डे यांनी मान्य करून त्यांना ३१/५/२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. याप्रकरणी ॲड. अभिजित सोलनकर व ॲड. सागर शिंदे यांनी काम पाहिले
