नोकरी

पुणे अपघात प्रकरण अखेर गाजले पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी निलंबित

(संभाजी पुरीगोसावी पुणे जिल्हा प्रतिनिधी)

पुणे:- पोर्श कार अपघात प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत ठरले आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्याचा निर्णय पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार साहेबांनी घेतलेला आहे. प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहोचलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी या अपघाताची माहिती कंट्रोल रूमला न कळवल्याने तसेच या अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेले डी.सी.पी. संदीप गिल साहेब यांच्याकडे पोहोचलेली नव्हती. या कृत्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासावर देखील संशय व्यक्त केला जात होता. पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसून केल्याचा आरोप करीत आरोपीला फायदा पोहोचवण्यासाठी त्यांनी तपासात मुद्दाम आणि घोळ केले असा आरोप विरोधी पक्षाकडूंन होऊ लागल्यानंतर घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जावुन दिले, त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्राथमिक चौकशीअंती येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहून जगदाळे आणि स.पो.नि. विश्वनाथ तोडकरी यांना दोषी ठरवून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!