सामाजिक

17 वर्षा पासून दर वर्षी प्रमाणे या हि वर्षी. 2568 व्या तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन

(प्रतिनिधी वसमत) दि.24.मे.2024

शासकीय रक्तदान शिबीर आहे.
सर्व दानशुर रक्त दात्यास विनंती आहे सदरील रक्तदान शिबीरास भव्य करूण प्रत्यक्ष कृतीतुन तथागतास अभिवादन करावे व अखिल मानवाचे हित साधावे .
18 वर्षा वरिल निरोगी, तदुंरूस्त पात्र युवक मित्रांना रक्तदात्यांना दाना करिता प्रोत्साहीत करूण मानव कल्याणकारी शिबीरास यशस्वी करण्यास सहकार्य करावे ही नम्र विनंती.45 किलो वजनाच्या वरिल निरोगी व्यक्तीच्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असते. त्यातील फक्त 250 ग्रॅम रक्त दानात घेतल्या जाते दिलेले दान 24 तासात शरीरात परत येते रक्त बननीण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते . दानदात्याचे काहीही नुकसान होत नाही. दान दिल्या मूळे स्वःताची रोग प्रतिकार शक्ती वाढते . व एका गरीब गरजु रूग्णांचा आपन जीव वाचवु शकतो . रक्तदान म्हणजे जीवनदान म्हणुन परिसरातील पात्र तरूण ,युवक , युवतीनी स्वेच्छा दान देऊण समता वादी कार्यक्रमास सहकार्य करावे . सर्वांचे रक्त लाल असल्या मुळे भविष्यात रक्ताची गरज पडल्यास दात्याने दिलेले रक्तदान रक्ताची पिशवी शासकीय रक्तपेढीत परत मिळण्याची शासनाने तरतुद केलेली आहे रक्तदात्यास महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र देऊण सन्मानीत करण्यात येते परिसरातील इच्छूक दानशुर दात्यानी रक्तदान करूण पुण्य कमवावे असे अवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!