महाराष्ट्र

लेकरांनी केला जन्मदात्याचा खून लग्नांस नकार देणाऱ्या वडिलांवर दोन मुलांनी चाकूने सपासप वार छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

जिल्हा प्रतिनिधी छ.संभाजीनगर संभाजी पुरीगोवासी

संभाजी पुरीगोसावी (छ.संभाजीनगर ) प्रतिनिधी. वडील लग्न करून देत नाहीत आणि जमिनीची वाटणी करून देत नाही, या शिल्लक कारणांतून जन्मदात्या मुलांनीच वडिलांवर चाकूने सपासप वार केले, छत्रपती संभाजीनगरच्या वडगांव कोल्हाटीमधून ही घटना समोर आली आहे. या घटनेत 48 वर्षीय संपत वाहूळ यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज मध्ये 15 दिवसांपूर्वी वडील आणि मुलांमध्ये वाद झाला होता लग्न करू देत नाही, आणि जमिनीची वाटणी करीत नाही या कारणांतून दोन मुलांनी रागाच्या भरात वडिलांवर चाकूने हल्ला केला. प्रकाश आणि पोपट वाहूळ अशी दोन मुलांची नावे आहेत. या हल्ल्यात मुलांचे वडिल गंभीर जखमी झाले आहेत. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील वडगांव कोल्हाटीत ही घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेले संपत वाहूळ यांना घाटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. वाळूज एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर मुलांच्या कृत्याबद्दल संताप तर वडिलांसाठी हळहळ व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!