नोकरी

हिंगोलीच्या जवानाला सिक्कीममध्ये वीरमरण… अंकुश एकनाथ वाहुळकर शहीद,अख्या गुंज गावाकडूंन कुटुंबांचे सांत्वन,उपस्थितांचे डोळे पाणावले, संभाजी पुरीगोसावी

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी)

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यांतील गुंज गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील जवान अंकुश एकनाथ वाहुळकर (वय २४) हे 2001 पासून देशसेवा करीत होते. सिक्कीम बिहारमधील पोर्णियाजवळ सैन्य दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात शहीद झाले आहेत. 22 मे. रोजी ही घटना घडली. 25 मे. रोजी सकाळी शासकीय मानवंदना देवुन पार्थिंवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, जवान अंकुश वाहुळकर सिक्कीम येथे सैन्य दलात कार्यरत होते.लहानपणापासूनच सैन्य दलात जाण्याची त्यांना आवड होती. परभणी ते झालेल्या मिलिटरी कॅम्पमध्ये ते सैन्य दलात भरती झाले होते. वसमत तालुक्यांतील गुंज आसेगांव येथेच त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले होते. मागील काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावाकडे येवुन पुन्हा कर्तव्यासाठी परतले होते, बुधवारी रांची वरून सिक्कीम आर्मीकडे सैन्य दलाच्या वाहनांतून सैन्यांची तुकडी जात असताना पोर्णियाजवळ झिरोमाइल भागात सैन्य दलाच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात जवान अंकुश एकनाथ वाहुळकर हे शहीद झाले घटनेची माहिती गावात समजताच गुंज गावांवर शोककळा पसरली अत्यंत मनमिळावू स्वभावाचा हा तरुण सर्वांचा चाहता होता. जवान अंकुश वाहुळकर यांचे पार्थिंव गुंज गावात दाखल होताच गावातील ग्रामस्थ मित्र मित्रपरिवार आणि कुटुंबाचा एकच आक्रोंश झाला. यावेळी सजवलेल्या लष्करी वाहनांतून गावातून जवान अंकुश वाहुळकर यांच्या पार्थिंवाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, जब तक सुरज चांद रहेगा अंकुश तेरा नाम रहेगा ! अमर रहे अमर रहे अंकुश वाहुळकर अमर रहे ! अशा घोषणा ग्रामस्थ मित्रपरिवारांनी दिल्या, त्यानंतर लष्करी विभाग आणि पोलीस प्रशासनाकडूंन जवान अंकुश वाहुळकर यांना अखेरची मानवंदना दिली,*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!