आरोग्य

गर्भपाताच्या साडेचार लाखांच्या गोळ्या जप्त, कोल्हापुरच्या करवीर पोलिसांची सांगलीत कारवाई, डॉक्टरसह चौघे जण पोलीसांच्या जाळ्यात

(संभाजी पुरीगोसावी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी)

दि.25.मे.2024

कोल्हापुरच्या करवीर सांगली गावांत गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध साठा करून विक्रेत्यांना त्याचा पुरवठा करणारा वितरक सुनील मल्लिनाथ मळगे (वय ४९) रा. सांगलीवाडी सांगली ) याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या सांगलीवाडी येथील घराची झडती घेतली असता सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे 946 गोळ्यांचे किट पोलिसांनी हस्तगत केले, यामध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॉकेटचा तपास करताना प्रथमच पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा सापडला. करवीर तालुक्यांत ठिकठिकाणी अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या टोळीचा तपास करताना करवीर पोलिसांनी महत्त्वाची माहिती हाती लागली. गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारा संशयित हाती लागताच त्याची अधिक चौकशी सुरू आहे त्याने कोणाकडूंन गोळ्या आणल्या कोणाला पुरवठा केला? कधीपासून हा व्यवसाय सुरू आहे? याचा तपास केला जाईल अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार यांनी दिली आहे. सहा आरोपी अटकेत या गुन्ह्यात पोलिसांनी गेल्या आठवड्याभरात बोगस डॉक्टरसह तीन एजंट आणि गोळ्याची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यांस अटक केली आहे. सुनील मळगे हा या रेकॉर्डमधील सहावा आरोपी असल्यांची माहिती पोलिसांनी दिली आहे. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!