सामाजिक

किनवट सामाजिक वनीकरण विभागाच्या संगोपनामुळे रोपे डोलु लागले

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

दि.25.मे.2024

(दशरथ आंबेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी)

किनवट :- विदर्भ आणि मराठवाडा पैनगंगा नदीकाठावर प्रसिद्ध असे देवस्थान तसेच निसर्गरम्य वातावरणात वसलेले भगवान परशुराम यांच्या चरण स्पर्शाने पावलेले ठिकाण म्हणजे मौजे सहस्त्रकुंड पर्यटनस्थळ येथील बेलवने व पंचायत वन रोपवन याच बरोबर किनवट परीक्षेत्रातील लागवड झालेले रस्ता दुतर्फा रोपवने,विविध कामावर लागवड रोपे चांगल्या प्रकारे जगलेले संगोपनामुळे डोलु लागल्याचे दिसून येत आहे.याबाबत नागरिकातुन सामाजिक वनीकरण कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे.
तापमानात होणारी वाढ,दिवसेंदिवस उन्ह वाढत चाललेले आहे.यातच वाटसरु सावलीचा आडोसा धरून थोड वेळ का होईना,विरुंगुळा म्हणून आरामासाठी झाडे शोधण्याचा प्रयत्न करतात.अश्यातच झाडे दिसल की, आल्हाददायक वाटते. याच झाडांची लागवड,वाढ,संवर्धनकरणाचे काम सामाजिक वनीकरण विभाग नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र किनवट एक मोलाचे दगड बनत चाललेले आहे.
येथील सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी श्री संदीप चव्हाण,श्रीमती संध्या बागडे मॅडम वनपरिक्षेत्राधिकारी किनवट यांच्या कडून प्रत्येक कामाचा वेळोवेळी आढावा घेऊन कामाबाबत पाठपुरावा करून सर्व नांदेड वन विभागातील कामे चांगल्या प्रकारे होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!