रिलायबल अॅग्रो फूड्स तर्फे कानडखेड, ता. पूर्णा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

शनिवार 5 जून 2026
पुर्णा शहर प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रिलायबल ऍग्रो फूड्स, कानडखेड, तालुका पूर्णा यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले, ज्यामध्ये पर्यावरण मार्च, सायक्लोथॉन आणि काही जनजागृती सत्रांसह वृक्षारोपणही करण्यात आले. रिलायबल अॅग्रो फूड्स पूर्णा, कानखेड चे माजी सरपंच मारोतराव बखाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षणावर चर्चा केली आणि सर्व सन्माननीय नागरिकांना प्लास्टिकचा कमी वापर किंवा न वापरण्यास प्रोत्साहित केले. येणाऱ्या भविष्यासाठी उत्तम नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शहरवासीयांनी सहकार्य करावे,
एचएमए ग्रुपचे संचालक श्री.शाहिद हुसेन, व्यवस्थापक अमरनाथ पटेल, डॉक्टर मोहम्मद अयुब,अब्दुल समद,श्रवण झा, शेख इस्माईल सर्व कर्मचारी व शहरातील रहिवाशांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.



