पूर्णा तालुका-भूमी अभिलेख अधिकाऱ्या कडून जमिनीचा मोजमाप करण्यासाठी टाळाटाळ

शुक्रवार 5 जून 2026
पुर्णा(प्रतिनिधी) नगर परिषद हद्दीतील पचशील नगर, पूर्णा येथे सर्वे न १७६/२ जमीन ज्याता क्षेत्रफळ ०५.४६ (आर) असून तो जमीन मोजणी व बंदी करून देण्याची मागणी करून ही भूमी अभिलेख कार्यलया कडून जाणून बुजून जमिनीची मोजनी करून देण्यात येत नसल्याने संताप व्यक्त करून भूमिअभिलेख अधिकाऱ्यांचे व जमिनी हडप करणाऱ्या भूमाफियाशी काही साटेलोटे तर नाही ना?आशा प्रश्न निर्माण झाला आहे
पूर्णा नगर परिषदच्या हद्दीत असलेला पंचशील नगर येथील सर्वे न १७६/२ मध्य असून ज्याचा क्षेत्रफळ ०५.४६ (आर) असे आहे.आणि या जमिनीचा. खरेदीखताचा व्याहार झाला असून दिः१-४-२००२ रोजी खारी दिखात. क्रः १२१८/२००२ नोंदणीकृत करन्यात आला आहे. शेजारचे लोक अमच्या जमिनी मध्ये बळजबरी घुसत आहे त्यामुळे जमीनीचा नियमा प्रमाने शासनाचा मोज माप करण्याचा शुल्क घेऊन जमिनीचा पूर्णपणे खुणा मोजणी व बंदी करून देण्याची मागणी जागा मालक शेख सिराज शेख गफूर यांनी लेखी स्वरूपात पूर्णेतील तालुका भूमिअभिलेख कार्यलया कडे 11नोव्हेंबर 2025 रोजी केली होती परंतु सहा ते सात महिने होऊन ही पूर्णा तालुका भूमिअभिलेख कार्यलयाकडून शेख सिराज यांच्या जागेची मोजणी करून दिली नाही त्यामुळे जो पर्यत मोज माप होत नाही तो पर्यत सर्वे न १७६\२चा कोणत्याच स्वरूपाचा व्यवहार किंवा विक्री करण्यात येऊ नाये अशी मागणी केली आहे.असे बऱ्याच नागरिकांनी तालुका भूमिअभिलेखा कडे मोज माप करण्याचे अर्ज केले आहे तरी पण भूमिअभिलेख कार्यलया कडून कामचुकार पणा कडून जमिनीची मोज माप करून टाळाटाळ करन्यात येत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे त्यामुळे या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे



