Uncategorized

नांदेड मालटेकडी रेल्वे स्टेशन परिसरात चालकावर प्राणघातक हल्ला; ट्रकाची केली तोडफोड

सोमवार १ जुन २०२६

नांदेड (प्रतिनिधी):
वडिलांशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका चालकावर हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालटेकडी रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी ही घटना घडली असून, हल्लेखोरांनी चालकाच्या ट्रकाची समोरील काच फोडून मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी इत्त्वारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेख सरफराज शेख जमीर (वय ३३, रा. अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड) हे व्यावसायिक चालक आहेत. रविवारी, दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास तक्रारदार मालटेकडी रेल्वे स्टेशन परिसरात गेले होते. याच वेळी आरोपी शेख रूमान पि. शेख पाशा आणि शेख अरहान पि. शेख पाशा हे तिथे आले.
आरोपींनी तक्रारदाराला त्यांच्या वडिलांसोबत झालेल्या भांडणाबाबत विचारणा केली आणि वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी तक्रारदाराला हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तक्रारदाराच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आहे. एवढेच नाही, तर आरोपींनी तक्रारदाराच्या ट्रकाची (क्र. MH26B5598) समोरील काच फोडून नुकसान केले. दरम्यान, शेख अर्शद शेख अलाबक्ष आणि परमेश्वर गोरे यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले.
या तक्रारीवरून इत्त्वारा पोलिसांनी आरोपी शेख रूमान पि. शेख पाशा आणि शेख अरहान पि. शेख पाशा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर भोगुजीराव खनल हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!