Uncategorized

महसूल बुडवून साठवलेली रेती अखेर गोरगरीब घरकुलधारकांच्या हक्कासाठी रिपब्लिकन सेनेच्या आक्रमक लढ्याला यश

गुरुवार 28 मे 2026

पूर्णा (तालुका प्रतिनिधी):शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून पूर्णा शहरात बेकायदेशीरपणे साठवलेली रेती अखेर गोरगरीब घरकुलधारकांच्या हक्कासाठी वापरण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार सूर्यवंशी यांनी या प्रकरणात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा मोठा विजय साध्य झाला असून, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.नेमके प्रकरण काय?पूर्णा तहसील कार्यालयाच्या परिसरात निवासी क्वार्टरचे काम ‘पल्लवी कन्स्ट्रक्शन’ (परभणी) आणि ‘भूमी अभिलेख’ कार्यालयाचे काम ‘बिहार कन्स्ट्रक्शन’ (परभणी) यांच्यामार्फत सुरू आहे. या बांधकामासाठी लागणारी रेती शासनाचा महसूल न भरता तहसील कार्यालयाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आली होती. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असतानाही संबंधित स्थानिक प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता.राजकुमार सूर्यवंशी यांची आक्रमक भूमिकाया गंभीर प्रकाराची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार सूर्यवंशी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गोरगरिबांच्या हक्काची रेती कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही, असा सज्जड इशारा देत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या बेकायदेशीर रेती साठ्याबाबत त्यांनी वेळोवेळी लेखी पाठपुरावा करत प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्या या सातत्यपूर्ण संघर्षामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले.घरकुलधारकांना मोठा दिलासासूर्यवंशी यांच्या या लढाऊ भूमिकेमुळे प्रशासनाने संबंधित रेती साठ्यावर कारवाई करत, ती रेती शहरातील गरजू घरकुलधारकांना मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक गरीब कुटुंबांना प्रत्येकी पाच ब्रास रेती मिळाली असून, त्यांच्या हक्काचे घर पूर्ण होण्यास मोठी मदत झाली आहे.जनतेकडून अभिनंदनाचा वर्षावराजकुमार सूर्यवंशी यांच्या या कार्यामुळे पूर्णा तालुक्यातील जनतेतून मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले जात आहे. ‘जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारा नेता’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या विजयानंतर बोलताना राजकुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, “रिपब्लिकन सेना यापुढेही पूर्णा तालुक्यातील अन्याय, भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात अधिक तीव्रतेने लढा देत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!