
संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

गुरुवार.दि.5. सप्टेंबर.2024
प्रतिनिधी./पूर्णा पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, नायब तहसीलदार प्रशांत थारकर,न.प.चे गणेश रापतवार, महावितरण चे वसमतकर, मौलाना शमीम अहमद रिझवी, माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम होते. प्रास्ताविक पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी केले. या बैठकीत अनेक मान्यवरांनी सुचना मांडल्या. सर्वधर्म समभावाची भावना जपण्याचे आवाहन केले. या वेळी रिपाई चे नेते प्रकाशदादा कांबळे, पत्रकार विजय बगाटे, सुभाष ओझा, मुजीब कुरेशी , मोहम्मद शफिक, शेख अमीन सर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या बैठकी साठी तालुक्यातील पोलीस पाटील, मंडळाच्या पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, नगरसेवक, पत्रकार, शांतता समितीचे सर्व सदस्य यांनी उपस्थिती दर्शवली होती सूत्रसंचालन पत्रकार जगदीश जोगदंड यांनी केले. आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक रामकिशन नांदगावकर यांनी मानले.




