संविधानाची शपथ विसरुन दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य व चिथावणी दिल्यामुळे विधानसभा आमदार नितेश नारायण राणे यांचे विधानसभा सदस्य रद्द करण्याची मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
गुरुवार.दि.5. सप्टेंबर.2024
प्रतिनिधी पुर्णा-:मगिरी महाराजांच्या समर्थनार्थ नितेश राणे याच्या नेतृत्वाखाली अहमदनगर व श्रीरामपूर येथे हिंदु आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मोर्चावेळी तुम धर्म की रक्षा करो, धर्म तुम्हारी रक्षा करेगा असे बॅनर लावलेल्या मंचावरुन भाषण करताना नितेश राणे म्हणाला कि, मुस्लीमांना मस्जिद मध्ये घुसून मारण्याची धमकी दिली व मुस्लीम धर्मीयांबद्दल खालच्या पातळीवर भाषा वापरली व रॅली दरम्यान मस्जिदच्या मिनारकडे हातवारे करुन बंदुकीची गोळी मारण्याचा इशारा केला व पुढे म्हणाला कि, मला पाहून मुसलमान लोक त्यांची घराची दारे व दुकानाची शटरे बंद करुन घेतात, मी हिंदूंचा गब्बर आहे असे संबोधून दोन समाजात तेढ निर्माण केला आणि सतत अशाच प्रकारे नितेश राणे व त्याचे कुटुंबिय सतत प्रसारमाध्यमाद्वारे व व्यासपिठावरुन मुस्लीम समाजाबद्दल आक्रोश व घृणास्पद वाक्यांचा प्रचार करुन दोन समाजामध्ये विष पेरण्याचे काम करत आहे व त्यांच्या सदरीलच्या बेजबाबदार व घृणास्पद वाक्यांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा सदसत्व घेतांना त्यांनी संविधानाची शपथ घेतली होती की, मी देवाची शपथ घेतो / मी शपथ घेतो की कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर माझी खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल आणि मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखीन परंतु उपरोक्त प्रमाणे वक्तव्य करुन त्यांनी घेतलेली शपथ तोडली आहे व दोन समाजात तेढनिर्माण करुन जातीय राजकारण करुन एका विशिष्ठ समाजाबद्दल मनात व्देष, घृणा व वैमनस्य ठेवले आहे. त्यामुळे नितेश राणे हे विधानसभेचे सदस्य राहण्यास पात्र नाहीत. त्यामुळे त्यांना अपात्र करुन त्यांचे सदसत्व रद्द करण्याची पुर्णा तहसीलदार तहसील कार्यालय पुर्णा यांच्या मार्फत. महामहिम राज्यपाल राजभवन मुंबई, मा.ना. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र यांना देण्यात आले आहे



