अतिवृष्टीने बाधित शेत जमिनी, पिके, घरे व शेतक-यांच्या पशुधनाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
मंगळवार.दि.03.सप्टेंबर 2024
गंगाखेड, पालम, व पुर्णा, या तिनही तालुक्यातील १६ महसुल मंडळात दि.०२ सप्टेंबर-२०२४ रोजी अतिवृष्टी झाली असुन शेतक-यांच्या शेत जमिनी खरडुन गेली आहेत. शेतातील उभ्या पिकात दोन-तीन फुट पाणी साचल्याने शेतक-यांचे कापुस, तुर, मुग, उडिद, सोयाबिन इत्यादी पिके पाण्याखाली गेली असल्याने शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या पाण्याबरोबर वारे वेगाने वाहत असल्याने शेतक-याच्या फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. ओढे, नाले व नदिकाठच्या जमिनीत पाणी शिरले असुन जमिनीतील माती वाहुन गेली आहे.मागील २४ तासात अतिवृष्टी झाली असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ, परभणी कृषी हवामानशास्त्र विभाग यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार गंगाखेड तालुक्यातील पाचही महसुल मंडळात एका तासात सरासरी १२८.२ मि.मि. पाऊस झाल्याची नोंद झालेली आहे. तसेच पालम तालुक्यातील पाच महसुल मंडळात एका तासात सरासरी १३४.४ मि.मि.ची नोंद झाली आहे. आणि पुर्णा तालुक्यातील एकुण सहा मंडळापैकी पाच महसुल मंडळात एका तासात सरासरी १११.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असुन पुर्णा महसुल मंडळात अतिवृष्टी झाली नसल्याचे नोंदविले आहे. परंतु वास्तव पाहता पुर्णा महसुल मंडळातील शेतक-यांचेही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीने बाधीत महसुल मंडळात पुर्णा महसुल मंडळाचाही सामावेश करणे गरजेचे आहे.तरी गंगाखेड, पालम व पुर्णा तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतजमिनी, पिके, शेतक-यांचे पशुधन, घरे इत्यादींचे तात्काळ पंचनामे करून शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी गंगाखेड, पालम, व पुर्णा, चे आ.डॉ रत्नाकर गुट्टे यांनी.मा.ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी केली आहे



