राजकीय

रेल्वे इन्स्टिट्यूट पूर्णा येथील निवडणुकीत रेल्वे मजदूर युनियन ची एक हाती सत्ता

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

शुक्रवार.दि.30.ऑग.2024

पूर्णा(प्रतिनिधी) येथील रेल्वे इन्स्टिट्यूट या कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेची द्विवार्षिक निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत रेल्वे मजदूर युनियन या संघटनेनी एक हाती सत्ता आली आहे
मागील दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत विजयी झालेले एम्प्लॉईज संघ या संघटनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. पूर्णा हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत रेल्वे इन्स्टिट्यूट ही संस्था रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत आहे दिनांक 28 ऑगस्ट रोजी या ठिकाणी द्विवार्षिक निवडणूक संपन्न झाली यंदाच्या निवडणुकीत रेल्वे मजदूर युनियन या संघटनेचे नेते बाळू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल निवडून आले एम्प्लॉय संघ या मागील सत्ताधारी संस्थेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले बाळू गायकवाड यांनी सचिव पदासाठी 125 मतांनी सचिन गायकवाड यांचा पराभव केला बाळू गायकवाड यांना 290 तर सचिन गायकवाड यांना 165 मते मिळाली सहसचिव पदासाठी राजू भिसे हे विजयी झाले त्यांनी महादेव शिंदे यांचा 67 मतांनी पराभव केला तर कोषाध्यक्षपदी शैलेश विश्वकर्मा विजयी झाले त्यांनी शेख शरीफ यांचा पराभव केला मजदूर युनियन या विजयी पक्षाकडून सदस्य पदी दीपक अहिरे, दीपक नागोराव ,सागर अहिरे ,विजयकुमार बुद्धे, अमोल दवणे ,चित्र सेनकुरे, निलेश तुपे, पराभूत झाले विजयी झालेले तुकाराम प्रकाश काळे यांना 198 मते मिळाली या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, वसमत ,हिंगोली, वाशिम ,अकोला व लहान मोठ्या रेल्वे स्टेशनचे सभासद असलेले रेल्वे कर्मचारी मतदाना साठी आले होते मागील वेळी एम्प्लॉईज संघाचे कांचन ठाकूर यांनी एक हाती सत्ता मिळवली होती त्यांनी 25 वर्ष सत्तेत असलेल्या मजदूर युनियनचा पराभव केला होता परंतु यावेळी कांचन ठाकूर यांची जादू चालली नाही या निवडणुकीत मजदूर युनियन या संघटनेचे अनेक पदाधिकारी निवडणुकीत कार्यरत होते मागील दोन वर्षांपूर्वी रेल्वे इन्स्टिट्यूट या संस्थेचे सचिव असलेले तुळशीराम निवृत्ती गायकवाड उर्फ बाळू गायकवाड यांनी दोन वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यास यश आले. दिवसभर मतदान झाल्यानंतर सायंकाळी रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली रात्री उशिरा मतमोजणी संपन्न झाली यावेळी दोन्ही बाजूचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीत या दोन प्रमुख संघटने शिवाय रेल्वेच्या अनुसूचित जाती जमाती एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेकडून तीन उमेदवार उभे होते ते तिघेही पराभूत झाले याशिवाय मुंबई या भागात असणारी रेल्वे संघटना निवडणुकीत पराभूत झाली त्यांच्या सहाही उमेदवारांना 50 पेक्षा कमी मते मिळाली स्वतंत्र उभे असलेले रवी दुशिंगे व समदर लाला यांचाही या निवडणुकीत दारुण पराभव झाला तर या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांदेड येथील रेल्वे अधिकारी एन एम दुर्गाप्रसाद हे होते त्यांना एस एस राऊत प्राध्यापक एस एन धोपे तांदळे गुरुजी यांनी मदत केली. रेल्वे आरपीएफ यांच्यावतीने पोलीस इन्स्पेक्टर नरसिंहराव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता दरम्यान सर्व
मतमोजणी पूर्ण झाल्यावर विजयी झालेल्या उभेदवारच्या समर्थकानी पहाटे तीन वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!