शेतकरी पुत्राला विधानसभेत पाठवा – खा.संजय जाधवताडकळस येथे महाविकास आघाडीच्या सभेला प्रतिसाद

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
शनिवार 16 नोव्हेंबर 2024
ताडकळस: गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनदा विशाल कदम यांच्या माध्यमातून शेतकरी पुत्राला उमेदवारी दिली असून विधानसभेत शेतकऱ्यांचा आवाज बनण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल कदम यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन शिवसेना उपनेते खा.संजय जाधव यांनी ताडकळस येथील जाहीर सभेत केले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशालभाऊ कदम यांच्या प्रचारार्थ शनिवार १६ नोव्हेंबर रोजी नवा मोंढा परिसरात संवाद सभा आयोजित केली होती.
या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपनेते खासदार संजय जाधव,मा.आ.सुरेश देशमुख, अभिजीत देशमुख, बी .आर.देसाई, शहाजी देसाई , रितेश काळे, रामनारायण मुंदडा,ॲड.कु.प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील युवती जिल्हा प्रमुख युवासेना (उ.बा.ठा) परभणी आदींची उपस्थिती होती.
यावेळी सायखेडा साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित देशमुख यांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस शेतात राहणार नसल्याचे ग्वाही दिली.
तसेच माजी आ. सुरेश देशमुख यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास सोयाबीनला ७००० रुपये भाव मिळणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यशस्वीतेसाठी शिवसेना तालुकाप्रमुख काशीनाथ काळबांडे, सरपंच गजानन आंबोरे पाटील, उपसरपंच प्रतिनिधी संजय जल्हारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल भोसले,रंगनाथ भोसले,माणिक हजारे, गोपाळ आंबोरे,दलित आघाडीचे सुरेश मगरे, रायुकाँ तालुकाध्यक्ष गजानन कदम,सर्कलप्रमुख गजानन शिराळे,फेरोज पठाण,संचालक देवानंद नावकीकर, उपसभापती अंकुशराव शिंदे, काँग्रेस आयचे शहराध्यक्ष दिपक आंबोरे, बबलू माने,व्यंकटराव पौळ, संचालक नंदकिशोर मुंदडा, पंडितराव जाधव,उपशहरप्रमुख अनिल नरवटे, शेख शहेजाद,शेख अलिशा,शरद आंबोरे, व्यंकटेश पवार आदींनी केले आहे.




