नोकरीपरभणी

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील गुटख्यासह लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

मंगळवार.दि.27.ऑग.2024

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालम तालुक्यातील केरवाडी येथे २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास केलेल्या कारवाईत २१ हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि एक दुचाकी मिळून १ लाख १ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुटख्याची मोठी चैन जिल्ह्यात सक्रियस्थागुशाचे सपोनि. पांडुरंग भारती, पोलीस अंमलदार निलेश परसोडे, रंगनाथ दुधाटे, भदर्गे, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला दोन व्यक्ती त्यांच्या दुचाकीवर गुटखा घेवून येत आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीवरुन केरवाडी येथे सापळा लावत पोलिसांनी एम.एच. २२ बी.बी. ०२८१ या क्रमांकाची दुचाकी थांबविली. सदर वाहनावर असलेल्या इसमांजवळ २० हजाराचा गुटखा मिळून आला. या प्रकरणी योगेश सोनटक्के, राजेश्वर वाडेवाले यांच्यावर पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!