सामाजिक

महावितरणातील जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची भीमशक्ती संघटनाच्या वतीने मागणी

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

मंगळवार .दि.27.ऑग.2024

परभणी शहरातील प्रकाश आंबेडकर नगर, धार रोड, परभणी येथे आराध्या परमेश्वर शेळके या 6 वर्षीय मुलींचा खांबावरील विद्युत तार तुटून त्या तारेंचा शॉक लागून त्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरील घटना ही अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे परंतु या घटनेंस महावितरणातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत सदरील घटना महावितरण विद्युत विज कंपनी 2 या विभागातील असून तेथील नागरिकांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या वस्तीवरुन जाणारी विद्युत तार काढण्यात याव्यात सदरील तार ही झाडामध्ये अडकलेली असून त्या झाडांच्या फांद्यांच्या वजनाने विद्युत तार लोंबकळत आहेत व त्या अत्यंत हानिकारक आहेत त्यामुळे वस्तीच्या समोरील बाजूने पोल उभारून त्या नगरातील लोकांनी लेखी अर्ज करून देखील याकडे लक्ष दिले नाही सदरील तार ही गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी टाकलेल्या आहेत त्या तारा बदलून दुसऱ्या टाकण्याची गरज आहे की नाही याची तपासणी सुद्धा करण्यात आलेली नाही त्यामुळे सदरील घटना ही संबंधित महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्दीपणामुळे घडली असून असे लोकांच्या जीवांशी खेळणाऱ्या व संबंधित घटनेस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर भविष्यात अशा घटना होऊ नये म्हणून शहरातील वस्त्यांवर गेलेल्या विद्युत तार या वस्तीच्या बाजूने टाकण्यात याव्यात अन्यथा भीमशक्ती संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल या निवेदनावर. रवी सोनकांबळे, प्रविण कनकुटे, चक्रवती वाघमारे, सतीश भिसे, विक्रम काळे, राहुल कनकुटे, बबन वाव्हळे, दीपक कनकुटे, संजय वाव्हळे, अविनाश अंभोरे, यांचे स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!