सामाजिक

श्रद्धेय सितारामअप्पा एकलारे यांच्या स्मृतिदिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न….७७ जणांनी केले रक्तदान

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

सोमवार दि ‌26.ऑग.2024

पूर्णा -: श्रद्धेय सितारामअप्पा बाबारामअप्पा एकलारे (अण्णा) यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेचे सचिव अमृतराज कदम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार यांनी रक्तदान करण्याचे आव्हान केले होते त्या आव्हानाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून श्रद्धेय सितारामअप्पा एकलारे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.याप्रसंगी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य प्रमुख वक्ते विठ्ठल भुसारे (शिक्षणाधिकारी,योजना जि.प.वाशिम) विलास गोबाडे (पोलीस निरीक्षक पूर्णा). उत्तमरावजी कदम (कोषाध्यक्ष,श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्था,पूर्णा) भारत भूषण संकाये, शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, संतोषअप्पा एकलारे यांची प्रमुख उपस्थिती तसेंच संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे सचिव अमृतराज कदम,सहसचिव गोविंदराव कदम,सूर्यकांत कदम ,नितिनजी काबरा संचालिका सौ.भाग्यलक्ष्मी प्रमोद एकलारे,सौ.स्मिताताई अमृतराज कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार उपप्राचार्य डॉ.गजानन कुरुंदकर,व डॉ.शिवसांब कापसे, उप्राचार्य अभाजी खराटे संयोजन सहसमन्वयक डॉ. रवी बरडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर, डॉ. अजय कुऱ्हे उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मा. श्री अमृतराज कदम यांनी करताना म्हटले कि, मागच्या चार वर्षापासून श्रद्धेय सितारामअप्पा एकलारे यांच्या स्मृतिदिना निमित्त महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात येते.
अण्णाच्या सामाजिक, धार्मिक, व्यापार, शिक्षण क्षेत्राच्या सहवासातील आठवणी त्यांनी व्यक्त केल्या.अण्णा पूर्णेच्या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी आपला व्यापार फक्त पूर्णा शहरापुरतीच मर्यादित न ठेवता त्यांनी त्यांचा व्यापार नांदेड,परभणीला जिल्ह्याच्या ठिकाणी आपला व्यापार समृद्ध केला अण्णा धार्मिक रित्या खूप चांगल्या प्रकारे करत होते आणि तीच परंपरा एकलारे परिवार देखील पुढची पिढी चालू ठेवत आहे. अण्णाचा सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचा खूप मोठा सहभाग होता. एखाद्या सामाजिक क्षेत्रात कुठेही आर्थिक अडचण आली तर ते नेहमीच मदत करत एकलारे कुटूंबाच्या वतीने सामाजिक जाणीवेतून दरवर्षी ११००० हजाराची देणगी देण्यात येते.प्रमुख वक्ते विठ्ठल भुसारे यांनी स्मृतिदिन यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की श्रद्धेय सितारामआप्पा एकलारे यांनी पूर्ण परिसरातील गोरगरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय निर्माण करून आजच्या पिढीला शिक्षणाची द्वारे उघडून त्यांच्या आयुष्याला कलाटणी आहे.
शिक्षणामुळे माणसाचे मस्तक सुधारते तसेच माणूस विचार व विवेकशील होण्यासाठी मदत होते..रक्तदान शिबिरात एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप श्री गुरु डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य यांनी करताना श्रद्धे सितारामआप्पा एकलारे यांच्या धार्मिक सहवासाचा उल्लेख केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा चारूदत्त डाफने यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षण तर कर्मचारी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!