नोकरीपरभणी

शासनाच्या विविध योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा मा. डॉ. प्रताप काळे अप्पर जिल्हाधिकारी, परभणी यांचे प्रतिपादन

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

बुधवार.दि.7. ऑग

(प्रतिनिधी पालम)

पालम -: शासन निर्णयमहसूल व वन विभाग संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१३६/ई-१, दिनांक ३० जुलै २०२४ अन्वये, राज्यात दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करणे बाबत आदेशीत केलेले आहे.परभणी जिल्हयात महसूल पंधरवाडा अंतर्गत विविध दैनिक कार्यक्रमातील एक भाग म्हणुन दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रोजी “युवा संवाद” तहसील कार्यालयात घेण्यात आला.सदर कार्यक्रमात मा. श्री डॉ. प्रताप काळे अप्पर जिल्हाधिकारी परभणी, मा. श्री जिवराज डापकर उपविभागिय अधिकारी, गंगाखेड, मा. श्री कैलासचंद्र वाघमारे तहसिलदार पालम श्री शिसोदे गट विकास अधिकारी, पालम सर्व महसूल कर्मचारी, शिवनेरी महाविदयालयाचे विदयार्थी व विविध योजनेचे लाभार्थी, शेतकरी तसेच लोकप्रतीनिधी उपस्थितीत होते.सदर कार्यक्रमांत यावेळी श्री डॉ. प्रताप काळे अप्पर जिल्हाधिकारी परभणी यांनी महसूल विषयक विविध योजनाचे मार्गदर्शन केले. तसेच शिवनेरी महाविदयालयाचे विदयार्थ्यांशी संवाद साधला व विविध प्रमाणपत्र उत्पन्न, रहिवाशी, जातीचे प्रमाणपत्र, मतदान कार्ड, दिव्यांगाना राशन कार्ड चे वाटप केले मंडळ अधिकारी, चाटोरी यांनी वादग्रस्त फेरफार निकाली काढुन नक्कल देण्यात आली. तसेच शेतक-यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी केली. मनरेगा अंतर्गत कापसी येथील विहिरीच्या कामाची पाहणी केली. तसेच तहसील कार्यालयात मा. श्री डॉ. प्रताप काळे अप्पर जिल्हाधिकारी परभणी यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!