
संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200
गुरुवार .8.ऑग
परभणी -: सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे रणसिंग फुंकले असून यानिमित्त मराठवाड्यात नवनिर्माण यात्रा या माध्यमातून सर्व जिल्ह्यात भेट देत आहेत याच नवनिर्माण यात्रा निमित्त परभणी जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणूक पक्ष संघटना बांधणी याविषयी नवनिर्माण यात्रा उद्या दिनांक 9/8/2024 शुक्रवार रोजी सकाळी ठीक 9 वाजता आपल्या परभणी शहरात दाखल होणार आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत पक्ष निरीक्षक गणेश भाऊ सातपुते योगेश खैरे मनसे प्रवक्ते सावली विश्रामगृह येथे मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी सर्व विधानसभा तील कार्यकर्त्यांना काही निवडणूक संदर्भात सूचना मार्गदर्शन करून सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष ,तालुकाध्यक्ष, शाखाध्यक्ष, यांना भेटून बीड करणे रवाना होणार आहेत या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यात सर्व मनसे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात मोठा उत्साह संचरला असून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी परभणी येथे उपस्थित रहावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के तालुका अध्यक्ष अनिल बुचाले शहर अध्यक्ष गोविंद राज ठाकरे यांनी केले



