नोकरीपरभणीसामाजिक

रक्तदान करून पोलीस अधीक्षक परदेशी यांचा वाढ दिवस केला साजरा

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

गुरुवार.8.ऑग

परभणी जिल्हा प्रतिनिधी

परभणी पोलीस मुख्यालयाच्या सह्याद्री मंगल कार्यालयामध्ये परभणी जिल्हा पोलीस प्रमुख श्री रवींद्रसिंह परदेशी यांचा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी च्या वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक श्री डॉक्टर नागेश लखमावार व त्यांची रक्तपेढी टीम यांना बोलावून घेऊन पोलीस अधीक्षकांच्या वाढदिवसानिमित्ताने जनसामान्यांच्या जीविताच्या रक्षणा कामी येण्यासाठी 41 पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान केले. यामध्ये स्वतः पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांचा मुलगा विक्रांत अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे गंगाखेड उपविभागाचे एस डीपीओ डॉक्टर दिलीप टिपरसे, पोलीस मुख्यालयातील कमांडोंचे जवान विविध ठाण्यातील कर्मचारी तसेच महिला कर्मचारी असे मिळून 41 जणांनी रक्तदान केले हे रक्त सध्याच्या डेंगूसदृश्य रोग निदानासाठी सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी वापरली जाणार आहे तसेच माननीय पोलीस प्रमुखांच्या सूचनेवरून हार तुर्‍यांमध्ये पैसे न घालवता एकमेकांना देशी वृक्ष भेट म्हणून देण्याचे औचित्य साधले गेले त्यात अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी कडून वटवृक्ष निम आपटा आवळा पिंपळ जांभूळ आम्रवृक्ष अशी अनेक झाडे सप्रेम भेट म्हणून प्राप्त झाली ती सर्वे झाडे पोलीस मुख्यालयामध्ये वाढदिवसाचा बगीचां अशा आशयातून बगीचा तयार केला जाणार असून पोलीस अधीक्षकांच्या वाढदिवसाची ही एक बगीच्या रूपातून आठवण जपली जाणार आहे आजचा वाढदिवस केवळ सन्मानापुरता सीमित न ठेवता या वाढदिवसाच्या माध्यमातून आजचा हा दिवस रक्तदानाच्या निमित्ताने जनसामान्यांचे हितासाठी आला यासाठी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी रक्तदानाची केलेले नियोजन याबाबत शैल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार तसेच पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांनी इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक व अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!